Pune Rains : बारामतीत विहीर गेली वाहून! (व्हिडिओ)

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 26 सप्टेंबर 2019

नाझरे धरणातून कऱ्हा नदीला सोडलेल्या पाण्यामुळे आज बारामती शहरात पूर आला होता. सुमारे 45 हजार क्युसेक्स इतक धरणातून पाण्याचा विसर्ग झाल्यामुळे कऱ्हा नदीने आपले खरे रूप दाखवून दिले.

बारामती शहर : नाझरे धरणातून कऱ्हा नदीला सोडलेल्या पाण्यामुळे आज बारामती शहरात पूर आला होता. सुमारे 45 हजार क्युसेक्स इतक धरणातून पाण्याचा विसर्ग झाल्यामुळे कऱ्हा नदीने आपले खरे रूप दाखवून दिले.

अत्यंत वेगाने वाहणाऱ्या पाण्यातून एका विहिरीची रिंग वाहत आल्यानंतर या पाण्याचा वेग किती प्रचंड होता त्याचा अनुभव सर्वांना आला. वेगाने वाहणाऱ्या पाण्यासोबत इतर सर्व वस्तू सोबतच जेव्हा विहिरीची सिमेंट काँक्रीटची वरच्या बाजूला असणारी रिंग वाहत आली, तेव्हा अनेक बारामतीकरांनी आश्चर्याने तोंडात बोटे घातली.

 

शहरातील खंडोबानगर येथे असलेल्या पूलाला ही लोखंडी रिंग जोरदार आपटल्यानंतर मोठा आवाज झाला. पुराच्या पाण्याचा वेग किती प्रचंड होता याची प्रचितीच या विहिरीच्या रिंगकडे पाहून बारामतीकरांना आली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ring on the well was carried away in karha river baramati