रिंगरोडला आचारसंहितेचा खोडा 

रिंगरोडला आचारसंहितेचा खोडा 

पुणे - पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) सादर केलेल्या पहिल्या टप्प्यातील रिंगरोडच्या कामाच्या "आर्थिक सुसाह्यता' अहवालाची छाननी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने करावी. त्यानंतर प्रकल्प अहवाल सादर करावा, अशी सूचना केंद्र सरकारच्या दळणवळण मंत्रालयाच्या सचिवांनी दिली आहे. तथापि, ही छाननी आणि त्यानंतर मंजुरीसाठी लागणारा वेळ लक्षात घेता रिंगरोडच्या प्रत्यक्ष कामाला लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेचा खोडा बसण्याची शक्‍यता आहे. 

रिंगरोडचा प्रस्ताव केंद्र सरकारच्या दळणवळण मंत्रालयाकडे अंतिम मान्यतेसाठी प्रलंबित आहे. त्यावर चर्चा करण्यासाठी दळणवळण मंत्रालयाच्या सचिवांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच दिल्लीत बैठक झाली. पहिल्या टप्प्यातील रिंगरोड हा 32 किलोमीटर लांबीचा आहे. नगर, सोलापूर आणि सातारा रस्त्यांना जोडणार हा टप्पा असणार आहे. यासाठी नगर रचना योजनेच्या माध्यमातून भूसंपादन करण्याचा निर्णय "पीएमआरडीए'ने घेतला आहे. रस्त्याच्या कामासाठी किमान दोन हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. हा खर्च राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण देणार आहे. त्यासाठी "पीएमआरडीए'ने प्रकल्पाचा "आर्थिक सुसाह्यता' अहवालही तयार करून घेतला आहे. या अहवालाची छाननी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने केल्यानंतर तो दळणवळण मंत्रालयाच्या स्थायी समितीकडे पाठवावा, अशी सूचना या बैठकीत सचिवांनी दिली. 

दरम्यान, लोकसभा निवडणुकीची अचारसंहिता या आठवड्यात लागण्याची शक्‍यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून या अहवालाची छाननी होऊन तो दळणवळण मंत्रालयाकडे सादर होण्यास लागणारा वेळ लक्षात घेता, त्याला मंजुरी मिळण्याची शक्‍यता कमी आहे. परिणामी, लोकसभा निवडणुकीनंतरच रिंगरोडचे प्रत्यक्ष काम सुरू होईल, असे "पीएमआरडीए'च्या अधिकाऱ्यांनी सांगण्यात आले. 

32 किलोमीटर  - रिंगरोडचा पहिला टप्पा 
2000 कोटी - अपेक्षित खर्च 

#WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक
तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या. 

#SakalSamvad #WeCareForPune

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com