रिंगरोडसाठी जागेची थेट खरेदी

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 16 फेब्रुवारी 2019

पुणे - पहिल्या टप्प्यातील रिंगरोडसाठी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) सहा गावांतील सुमारे ७० हेक्‍टर जागा थेट खरेदीने घेण्याचा निर्णय घेतला आहे. तसा प्रस्ताव प्राधिकरणाकडून जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविण्यात आला आहे. थेट जमीन खरेदीमुळे पहिल्या टप्प्याच्या रिंगरोडचे काम गतीने मार्गी लागण्यास मदत होणार आहे.

पहिल्या टप्प्यात आंबेगाव खुर्द ते वाघोली हा सुमारे ३३ किमी लांबीचा रिंगरोड पीएमआरडीएकडून विकसित करण्यात येणार आहे. त्यासाठी पीएमआरडीएने २ हजार ४६८ कोटी रुपयांची मागणी केंद्र शासनाकडे केली आहे. 

केंद्र सरकारने देशभरातील २८ रिंगरोडचा समावेश भारतमाला या प्रकल्पात करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामध्ये पीएमआरडीएच्या रिंगरोडचा देखील समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे हा रिंगरोड मार्गी लागण्यासाठी निधी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. हा प्रकल्प पीएमआरडीएच राबविणार असून, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (एनएचएआय) फक्त नियंत्रणाचे काम करणार आहे. रिंगरोडच्या दोन्ही बाजूंचे सर्व्हिस रोड पीएमआरडीएच्या निधीतून करण्यात येणार आहेत. पीएमआरडीएने हाती घेतलेला हा रिंगरोड प्रादेशिक विकास आराखड्यात दर्शविण्यात आला आहे. शहरातील वाहतूक कोंडी दूर होण्यासाठी रिंगरोड प्रकल्प महत्त्वाचा आहे. रिंगरोड सुमारे १२८.६६ किमी लांबीचा आणि १० पदरी असणार आहे. या एकूण प्रकल्पासाठी सुमारे १३ हजार ५०० कोटींची आवश्‍यकता आहे. आंबेगाव खुर्द ते वाघोली रिंगरोडसाठी केंद्र शासनाचे २ हजार ४६८ कोटी आणि प्राधिकरणाचे ३३० कोटी असा एकूण २ हजार ७९० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. पहिल्या टप्प्यातील या रिंगरोडमधील १० लेनपैकी ८ लेन एनएचएआयच्या निधीतून करण्यात येणार आहेत. तर सर्व्हिस रोडच्या दोन लेन या प्राधिकरणाच्या निधीतून करण्यात येणार आहे. हायब्रीड ॲन्युईटी मॉडेलनुसार रिंगरोडचे काम केले जाणार आहे. या मॉडेलनुसार सुमारे ४० टक्के निधी एनएचएआय देणार आहे. त्यामुळे उर्वरित रकमेसाठी वाहनांना टोल आकारला जाणार आहे.

रिंगरस्त्याची वैशिष्ट्ये 
  एकूण रिंगरोड १२८.६६ किमी लांबीचा 
  आंबेगाव खुर्द ते वाघोली असा पहिला टप्पा
  या टप्प्यात ३३ किमी लांबीचा रिंगरोड होणार 
  पहिल्या टप्प्यासाठी १२ किमी जागेचा ताबा 
  रस्त्याची रुंदी ११० मीटर म्हणजे १० पदरी रोड असणार 
  पुणे -सातारा ते नगर रोड जोडला जाणार 
  तीन बोगदे, रेल्वेमार्गावर दोन पूल आणि नदीवर एक पूल

या गावांतील जमिनींबाबत निर्णय
रिंगरोडचे भूसंपादन हे नगर रचना योजनेच्या माध्यमातून केले जाणार आहे. परंतु जांभूळवाडी, पिसोळी, गुजर निंबाळकरवाडी, आंबेगाव खुर्द, भिलारवाडी आणि मांगडेवाडी येथील जमीन थेट खरेदीने संपादित करण्याचा निर्णय पीएमआरडीएने घेतला आहे. डोंगराळ आणि तीव्र चढ-उताराचा भाग असल्यामुळे या भागात नगर रचना योजना (टीपी स्किम) राबविणे शक्‍य नाही. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.

Web Title: Ringroad Land Purchasing PMRDA