बसगाड्या फोडल्याप्रकरणी दंगलीचा गुन्हा दाखल 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 8 जून 2018

येरवडा - बंडगार्डन रस्त्यावर बसगाड्यांची तोडफोड व दगडफेक केल्याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात दहा ते पंधरा जणांवर दंगलीचा गुन्हा दाखल केला आहे. 

बुधवारी रात्री बसची धडक बसून झालेल्या अपघातात शहाबाज इसाक बागवान (वय 28, रा. चंदननगर भाजी मंडईजवळ) यांचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर संतप्त जमावाने पीएमपी व एसटी बसचे सुमारे साडेतीन लाख रुपयांचे नुकसान केले. 

अपघातानंतर बसचालक अजय सोनवणे (वय 32, पिंपळे सौदागर) बससह पळून गेला होता. त्यामुळे संतप्त जमावाने बस व एसटीवर तुफान दगडफेक केली होती. यामध्ये पीएमपी व एसटी बसचे सुमारे साडेतीन लाख रुपयांचे नुकसान झाले. परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या मदतीने दगडफेक करणाऱ्या आरोपींची शोध मोहीम सुरू आहे. 

सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून बागवान यांच्या दुचाकीला धडक दिलेल्या बसची माहिती पोलिसांनी गुरुवारी मिळविली. त्यानंतर बसचालक सोनवणेला शोधणे पोलिसांना सोपे गेले. बसमधील प्रवाशांनी सोनवणेला अपघात झाल्याची माहिती देऊनसुद्धा त्याने बस भरधाव वेगाने भोसरीकडे नेली. त्याने बस डेपो व्यवस्थापकालाही अपघाताची कल्पना दिली नव्हती. त्याला घरातून गुरुवारी रात्री सव्वा आठला अटक केल्याची माहिती पोलिस उपनिरीक्षक अरुण गौड यांनी दिली. 

Web Title: Riots filed for rioting