पुणे - अवजड वाहनांच्या अनाधिकृत पार्किंगमुळे धोका

कृष्णकांत कोबल
मंगळवार, 3 एप्रिल 2018

मांजरी (पुणे) : येथील लक्ष्मी काॅलनी ते शेवाळेवाडी बसडेपो दरम्यान अवजडसह इतरही वाहनांचे अनाधिकृत पार्किंगचे प्रस्थ मोठ्या प्रमाणात वाढले आहे. यापूर्वी अनेक वेळा कारवाई होऊनही दररोज चोवीस तास वेगवेगळ्या प्रकारची वाहने येथे अनधिकृतपणे थांबविली जातात. त्यामुळे रस्त्यावरून धावणाऱ्या वाहनांना अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. या अनाधिकृत पार्क केल्या जाणाऱ्या वाहनांवर कारवाई केली जावी, अशी मागणी प्रवाशांनी केली आहे.

पालिका हद्दीबाहेरील जागा म्हणून येथील लक्ष्मीकाॅलनी ते शेवाळवाडी बस डेपो दरम्यान विविध प्रकारची वाहने सोलापूर महामार्गाच्या दुतर्फा अनाधिकृतपणे पार्क केली जात आहेत. वाळू, खडी, वीट रेडीमिक्स, किराणा भूसार, भाजीपाला, फळे, फर्निचर व इतर विविध प्रकारची वाहतूक करणारी अनेक वाहने येथे रात्रंदिवस उभी केली जात आहेत. त्यामुळे पादचाऱ्यांसह वाहनचालकांनाही त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. 

शेवाळेवाडी बसडेपोच्या सिमाभिंतीलगत मालवाहू टेंपो दिवसभर उभे असतात. त्यामुळे येथे महामार्ग अरूंद झाला आहे. त्याच ठिकाणच्या पंक्चरमधून डेपोतील बस सतत ये-जा करीत असतात. त्यामुळे सोलापूरकडून येणाऱ्या वाहनांना येथे वारंवार अपघातसदृष्य परिस्थिती निर्माण होत असते. याशिवाय स्टडफार्म, लक्ष्मीकाॅलनी परिसर, बाजारसमितीच्या दोन्ही बाजू याठिकाणी अनेक अवजड वाहने उभी राहिलेली असतात. या सर्वच वाहनांमुळे कायमच त्रास सहन करावा लागत आहे. प्रशासनाकडून केवळ नावापुरती कारवाई केली जात आहे. सार्वजनिक बांधकाम खात्यासह पोलीसांचेही त्याकडे मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष होत असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे.

शाखा अभियंता ए. एल. गिरमे म्हणाले,""अनाधिकृत पार्किंग बाबत वाहतूक पोलीस कार्यालयाला कळविले होते. त्यांच्याकडून कारवाईही करण्यात आली आहे. मात्र, पुन्हा लक्ष्मीकाॅलनी ते शेवाळेवाडी बस डेपो दरम्यान वाहने अनाधिकृत उभी केली जात आहेत. पोलीसांना या अनाधिकृत पार्किंग बाबत माहिती देवून कारवाई करण्याची मागणी केली जाईल.''

Web Title: risky parking of heavy vehicle dangerous to people in pune