विधी अभ्यासक्रमाच्या प्रवेशापासून विद्यार्थी वंचित

Ritual-courses
Ritual-courses

पुणे - विधी अभ्यासक्रमासाठी पात्र ठरूनही अद्याप प्रवेश न मिळाल्याची तक्रार विद्यार्थी करीत आहेत. प्रवेशयादीच्या क्रमवारीत नाव असतानाही महाविद्यालयामार्फत प्रवेश नाकारले जात असल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे विधी अभ्यासक्रमाच्या तीन वर्षांच्या प्रवेशापासून पात्र विद्यार्थ्यांना वंचित राहावे लागत असल्याचे दिसून येते.

राज्यातील सुमारे ३२ हजार ३२३ विद्यार्थी विधी अभ्यासक्रमाची (तीन वर्षे) राज्य सामाईक प्रवेश परीक्षेत पात्र ठरले. जवळपास १४ हजार ३२० जागांसाठी त्यातील जवळपास २५ हजार ७९१ विद्यार्थ्यांनी अर्ज केला होता. आतापर्यंत चार प्रवेश फेऱ्यांमध्ये १३ हजार ७८५ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. तर, ५३५ जागा रिक्त आहेत, अशी माहिती राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत देण्यात आली आहे. मात्र, प्रत्यक्षात प्रवेश यादीनुसार प्रवेश दिले नसल्याचे काही विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. गुणांच्या क्रमवारीनुसार प्रवेश यादी लावण्यात आली. मात्र, प्रत्यक्षात महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी गेलो असताना, प्रवेश नाकारण्यात आला, असा अनुभव काही विद्यार्थ्यांनी सांगितला. कमी गुण असतानाही विद्यार्थ्यांना महाविद्यालयामार्फत प्रवेश दिले जातात. मात्र, गुण अधिक असूनही प्रवेश मिळत नाही, असे एका विद्यार्थिनीने सांगितले. 

विद्यार्थ्यांच्या तक्रारींविषयी राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाचे आयुक्त आनंद रायते म्हणाले, ‘‘प्रवेशाच्या पहिल्या फेरीत अंतिम प्रवेश यादी जाहीर झाल्यानंतर प्रवेशासाठी विद्यार्थी महाविद्यालयात गेले असता, विद्यार्थ्यांनी ऑनलाइन अर्जात भरलेली माहिती आणि प्रत्यक्षात मूळ कागदपत्रात असलेली माहिती यात तफावत आढळून आल्याने काही महाविद्यालयांनी अशा विद्यार्थ्यांचे प्रवेश नाकारले. परंतु, या विद्यार्थ्यांना अंतिम फेरीपर्यंत अर्जात आवश्‍यक ती दुरुस्ती करण्याची संधी देण्यात आलेली आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार सीईटी सेल प्रवेशाच्या केवळ तीन फेऱ्या घेऊ शकते. त्यानंतर महाविद्यालयामार्फत प्रवेशप्रक्रिया राबविली जाते. महाविद्यालयांना प्रवेशाबाबत आवश्‍यक सूचना देण्यात आल्या आहेत.’’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com