माजी सैनिक महिला बचत गटाच्या वतीने रिव्हर क्रॉसिंगचे आयोजन

दत्ता म्हसकर
सोमवार, 16 एप्रिल 2018

जुन्नर : ठिकेकरवाडी ता.जुन्नर येथे माजी सैनिक रमेश खरमाळे यांनी माजी सैनिक महिला बचत गटाच्या सहकार्याने रिव्हर क्राॅसिंगचे रविवारी यशस्वी आयोजन केले. जुन्नर तालुक्यातील ठिरकेकरवाडी म्हणजे एक रम्य नैसर्गिक ठिकाण. अष्टविनायक ओझरच्या विघ्नेश्वर मंदिरापासुन उत्तरेला 5 किमी अंतरावर, तर ओतुर पासून दक्षिणेला 5 किमी अंतरावर वसले आहे. तर पश्चिमेला तालुक्यातील मांडवी  व पुष्पावती नदी संगमावर नेतवड येथे 1954 मध्ये बांधलेले नेतवड धरण आहे. नेतवड धरणाच्या अगदी जवळचे हे ठिकाण. 

येथून पुढे पुर्वेस या नदीला पुष्पावती म्हणून संबोधण्यात येते. येथे प्रसिद्ध असे रांजणखळगे देखील पहावयास मिळतात. पुष्पावतीच्या उत्तर किनाऱ्यावरील वसलेले गाव म्हणजेच ठिकेकरवाडी. येथील ग्रामस्थांनी शेतीप्रधान संस्कृती तर टिकवली असून विविध उपाययोजनांनी गावाचा कायापालट केला आहे. म्हणूनच आदर्श गाव या नावाने ख्याती आहे. येथील वीज प्रकल्प व त्याचे नियोजन वाखाणण्या योग्य असून या गावचे सरपंच  संतोष ठिकेकर यांना विविध पुरस्कार देण्यात आले आहेत. त्याच पैकी सरपंच ऑफ द इयर या पुरस्काराने त्यांना नुकतेच सन्मानीत करण्यात आले आहे.

river crossing

गावचा विकास पर्यटनाचा माध्यमातून व्हावा व येथील तरूणांना गावातच रोजगार प्राप्त व्हावा ही त्यांची व ग्रामस्थांची चळवळ येथे पहावयास मिळते. यासाठी त्यांनी जुन्नर तालुका पर्यटन घोषित झाल्याने भविष्याचा विचार करता काही उपाययोजना करता येतील का म्हणून काल गावच्या जवळून वाहना-या पुष्पावती नदीमध्ये  वीर नारी माजी सैनिक महिला बचतगट यांच्या संयुक्त विद्यमाने रिव्हर क्राॅसिंगचे आयोजन "रेंज अॅडव्हेंचर पुणे" यांच्या मार्फत केले होते. या उपक्रमास चांगला प्रतिसाद मिळाल्याने ग्रामस्थांनी  समाधान व्यक्त केले. लहान मुलांसाठी हा चित्तथरारक अनुभव प्रथमतच अनुभवयास मिळाला. हे दृश्य पाहून वडीलधाऱ्या  व्यक्तींनी पण या इव्हेंट मध्ये सहभागी करून आम्हाला पण हा अनुभव एकदा घेऊ द्या अशी विनंती केल्याने त्यांची इच्छा पुर्ण करण्यात आली.

लवकरच हा इव्हेंट पुन्हा एकदा आपण निश्चित एक वेगळ्या माध्यमातून साकारणार असल्याचे सरपंच संतोष ठिकेकर यांनी सांगितले. या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा अपघात होऊ नये उपक्रमास गालबोट लागू नये म्हणून जुन्नर तालुक्यातील 20 माजी सैनिक उपस्थित होते. जुन्नर तालुका पर्यटन विकास एक जबाबदार पर्यटन म्हणुन सुरूवातीपासून विकसित करण्यासाठी माजी सैनिकांनी हे पाऊल स्वतः उचलले आहे त्यामुळे ठिकेकरवाडी ग्रामस्थांनी आभार व्यक्त केले. तसेच येणाऱ्या काळात माजी सैनिक संघ जुन्नर तालुका "सैनिक टुरिझम " संकल्पना तालुक्यात साकारणार असल्याचे हे संकेत आहेत.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: river crossing organised