नदीला कचरा डेपोचे स्वरूप

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 22 जून 2018

मुंढवा - केशवनगर परिसरात नागरिकांकडून ठिकठिकाणी कचरा टाकला जात आहे. नदीपात्र सध्या कचऱ्याने भरून गेले आहे. यामुळे दुर्गंधी व अस्वच्छतेची समस्या निर्माण झाली आहे. तसेच डासांची पैदास होऊन येथील रहिवाशांच्या आरोग्याचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. महापालिकेने कचरा टाकणाऱ्यांवर कारवाई करून परिसराची स्वच्छता करण्याची मागणी होत आहे.

नदीपात्रात कचरा टाकल्याने पर्यावरणाची मोठी हानी होत आहे. या ठिकाणी दररोज सुमारे दोन गाड्या कचरा टाकला जात असल्याचे नागरिकांनी सांगितले. त्यामुळे नदीला कचरा डेपोचे स्वरूप आले आहे. नदीच्या परिसरात राहत असलेल्या रहिवाशांना यामुळे दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत आहे. तसेच डासांमुळे मलेरिया, हिवताप, अतिसार या आजारांचे रुग्ण वाढले आहेत. यामुळे साथी रोग फैलावण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. झेड कॉर्नरजवळ रस्त्याच्या कडेला टाकल्या जाणाऱ्या कचऱ्यामुळे नागरिकांना दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत आहे. महापालिकेचे अधिकारी मात्र याकडे दुर्लक्ष करत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

महापालिका प्रशासनाने कचरा टाकणाऱ्यांवर कारवाई करण्याची गरज असल्याचे मत नागरिकांनी व्यक्त केले आहे. तसेच नदीपात्राच्या स्वच्छतेकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.

Web Title: river garbage depo