लोणी काळभोर नजिकचा नदीपात्र भरला कचऱ्याने

River Near Loni Kalbhor Is Full Of Garbage
River Near Loni Kalbhor Is Full Of Garbage

लोणी काळभोर - पुर्व हवेलीतील लोणी काळभोर, कदमवाकवस्ती, थेऊरसह मुळा-मुठा नदीलगतच्या बहुतांश गावातील कचरा मागील काही वर्षापासुन थेट नदीपात्रात टाकला जात आहे. नदीपात्रात कचरा टाकणे ही बाब पर्यावरणाच्या दृष्टीने अतिशय गंभीर आहे.

कचरा प्रकल्पासाठी ग्रामपंचायतीने केवळ जागा उपलब्ध करुन दिल्यास, स्वखर्चाने काही खाजगी कंपण्या कचऱ्यावर प्रक्रिया करणारे प्रकल्प उभारण्यास तयार आहेत. यामुळे ग्रामपंचायतीने जागा देण्याची तयारी दर्शविल्यास, लोणी काळभोर, कदमवाकवस्तीसह पुर्व हवेलीतील सर्वच ग्रामपंचायतीसाठी कचऱ्यावर प्रक्रिया करणारे प्रकल्प चालु करण्यासाठी सर्वतोपरी मदत करु असे, आश्वासन खासदार शिवाजीराव आढळराव यांनी कदमवाकवस्ती (ता. हवेली) येथे दिले. 

खासदार आढळराव यांनी शुक्रवारी (ता. 13) गावभेट दौऱ्याअंतर्गत लोणी काळभोर, कदमवाकवस्ती, कुंजीरवाडी ग्रामपंचायत कार्यालयांना भेट दिली. यावेळी सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्यासह गावातील प्रमुख नागरीकांच्या समवेत चर्चा केली. यावेळी कदमवाकवस्तीच्या सरपंच गौरी गायकवाड, उपसरपंच बाळासाहेब कदम व त्यांच्या सहकाऱ्यांनी रस्ते, पाणी व कचरा प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी खासदार या नात्याने आढळराव यांना मदत करण्याची विनंती केली होती. यावेळी बोलतांना आढळराव यांनी वरील आश्वासन दिले. 

यावेळी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख रामशेठ गावडे, जिल्हा परीषद सदस्य माऊली कटके, हवेली तालुका उपप्रमुख रमेश भोसले, भारतीय जनता पक्षाच्या कामगार आघाडीचे माजी जिल्हा प्रमुख चित्तरंजन गायकवाड, ग्रामपंचायत सदस्य सचिन दाभाडे, सविता साळुंखे, वैजंता कदम, राजश्री काळभोर, नाशिरखान पठाण, रमेश कोतवाल, ऋुषीकेश काळभोर, शरिफ खान, राणी बडदे, माधुरी काळभोर, रुपाली कोरे नितेश लोखंडे, अमृता कदम, ग्रामविकास अधिकारी पी. एस. देसाई आधी उपस्थित होते. 

यावेळी बोलतांना खासदार आढळराव म्हणाले, लोणी काळभोर, कदमवाकवस्ती, थेऊरसह मुळा-मुठा नदीलगतच्या बहुतांश गावातील कचरा व कोणत्याही प्रकारची प्रक्रिया न केलेले गटाराचे पाणी थेट नदीपात्रात सोडले जात आहे. ही बाब पर्यावरणाच्या दृष्टीने अतिशय गंभीर आहे. यासाठी संबधित ग्रामपंचातींचे पदाधिकाऱ्यांवर गुन्हाही दाखल होऊ शकतो. मात्र ग्रामपंचायतीनी कचऱ्यावर प्रक्रिया करणाऱ्या प्रकल्पासाठी जागा दिल्यास, ग्रामपंचायतीचा एक रुपयाही न घेता स्वखर्चाने कचर्यावर प्रक्रिया करणारे उद्योग उभारण्याची अनेक खाजगी कंपण्याची तयारी आहे. यातुन ग्रामपंचायतींना उत्पन्नही चालु होऊ शकते. कचरा प्रकल्प उभारणाऱ्या कांही कंपण्याशी चर्चाही झाली आहे. यामुळे ग्रामपंचातीना जागा उपल्ब्द करुन दिल्यास, पुढील काही महिण्यातच प्रकल्प चालु करण्यासाठी ग्रामपंचायतींना हवी ती मदत करु असे आश्वासन खासदार आढळराव यांनी दिले. 

तेल कंपण्याकडुन विकास कामासाठी मदत मिळवुन देणार-
खासदार आढळराव हिंदुस्थान पेट्रोलियम, भारत पेट्रोलियम व इंडीयन ऑईल कॉर्पोरशन या तीन तेल कंपण्याकडुन कदमवाकवस्ती ग्रामपंचायतीला विकास विकास कामासाठी मदत मिळत नाही. या ग्रामस्थांच्या तक्रारीबद्दल बोलताना खासदार आढळराव म्हणाले, कंपनी खाजगी असो वा सरकारी, सामाजिक विशेष दुरुस्ती निधीतुन स्थानिक ग्रामपंचायतीला मदत करणे कायद्याने बंधनकारक आहे. कदमवाक वस्ती हद्दीतील हिंदुस्थान पेट्रोलियम, भारत पेट्रोलियम व इंडीयन ऑईल कॉर्पोरशन या तीन तेल कंपण्या ग्रामपंचायतीला मदत करत नाहीत ही बाब गंभीर आहे. पुढील आठवडा भरात वरील तीनही कंपण्याच्या वरीष्ठ अधिकाऱ्यांच्या समवेत ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन, ग्रामपंचायतीला मदत मिळवुन देऊ असेही खासदार आढळराव यांनी स्पष्ट केले. 

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com