नदी पात्रातील रस्‍ता बंद

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 18 ऑगस्ट 2018

पुणे - धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पडलेल्या संततधार पावसामुळे खडकवासला धरणातून मुठा नदीपात्रात १८ हजार ४०० क्‍युसेकने पाणी सोडण्यात आले. धरणातून पाणी सोडल्याने कोथरूड, सिंहगड रस्त्यावरून डेक्कनला जोडणाऱ्या नदीपात्रातील रस्ता शुक्रवारी सकाळपासूनच वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला होता. त्यामुळे जंगली महाराज रस्ता, केळकर रस्ता, लालबहादूर शास्त्री रस्ता या मार्गांवर वाहतुकीची कोंडी झाली होती.

खडकवासला साखळी प्रकल्पातील धरणांमध्ये गेल्या तीन-चार दिवसांपासून श्रावणधारा बरसत आहेत. गेल्या चोवीस तासांमध्येही पावसाच्या सरी पडल्यामुळे धरणात येणाऱ्या पाण्याचे प्रमाण वाढले. त्यामुळे पहाटे चार वाजता १४ हजार क्‍युसेक पाणी सोडण्यात आले. 

वाहतूक कोंडी
नदीपात्रातील रस्ता सकाळपासूनच बंद करण्यात आला होता. त्यामुळे कर्वेनगर, कोथरूड, सिंहगड रस्ता येथील डेक्कनकडे येणारे प्रवासी वाहतूक कोंडीत अडकले. वाहतुकीचा वेग मंदावला होता. नदीपात्र, नळस्टॉप, सिंहगड रस्ता, पुणे स्टेशन, शिवाजीनगर भागात वाहतूक कोंडी बघायला मिळाली. वाहतूक कोंडीचा फटका पीएमटीलाही बसला. वाहतूक नियंत्रक दिवे बंद पडल्याने वाहतूक कोंडी झाली होती. 

नदीपात्र झाले वॉशिंग सेंटर
नदीपात्रात पुराचे पाणी आल्याने रिक्षा, दुचाकी अशी वेगवेगळी वाहने धुण्यासाठी चालकांनी आणल्याचे दिसत होते. जयंतराव टिळक पुलाजवळ, एस. एम. जोशी पुलाच्या खालील घाटावर ही गर्दी झाली होती.

पाणी बघण्यासाठी गर्दी
नदीचे दुथडी भरून वाहणारे पाणी पहाण्यासाठी पुणेकरांनी पुलांवर गर्दी केली होती. यात तरुणाईचा मोठा सहभाग होता. ही तरुणाई सेल्फी काढत असल्याचे दृश्‍य वेगवेगळ्या पुलांवर दिसत होते. 

Web Title: River Road Close by Mutha River Flood