रेटवडी कालव्याला भगदाड पडून घरांमध्ये शिरले पाणी; ग्रामस्थ रात्रभर जागे

River water in villagers home at retavadi taluka khed
River water in villagers home at retavadi taluka khed

दावडी - रेटवडी (तालुका खेड) येथील चासकमान धरणाचा डाव्या कालव्याला खरपाळवस्तीजवळ रात्री अडीचच्या सुमारास भगदाड पडून कालव्यालगत असलेल्या घरांमध्ये पाणी शिरले. पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी पाहणी करून तात्काळ पाण्याचा दाब कमी केल्यामुळे पुढील अनर्थ ठळला.

रेटवडी येथील खरपाळवस्ती येथे कालव्याशेजारीच 12 कुटुंबे रहात असुन सुमारे 60 लोकसंख्या आहे. कालव्यातून सुमारे वीस वर्षांपासून पाण्याची गळती होत आहे. पाणीगळतीमुळे येथील कुटुंबांना त्रास सहन करावा लागत आहे. येथील घरांशेजारून व घराखालून पाणी वहात असते तसेच घरामध्ये सतत ओलावा असतो. गुरूवारी (दि. 6) पहाटे 2:30 च्या सुमारास डाव्या कालव्याला भगदाड पडून  घरात पाणी शिरले. पाण्याचा व दगडांचा आवाज आल्यामुळे ग्रामस्थांना जाग आली. शिवराम नाना पवार, रविंद्र विष्णू पवार, संजय शिवराम पवार व वनिता प्रकाश पवार यांच्या घरात वेगाने पाणी व गाळ शिरला. पोलिस पाटील उत्तम खंडागळे यांनी तात्काळ पाटबंधारे विभागाला याबाबत माहिती दिली. वस्तीतील सर्व नागरीक रात्रभर लहान मुलांसह  कालव्यापासुन दुर सुरक्षित अंतरावर जाऊन थांबले.

पाटबंधारे विभागाचे अधिकाऱ्यांनी खरपाळवस्ती येथे भेट देऊन पहाटे 4 वाजता तातडीने पाण्याचा दाब कमी केला, त्यामुळे पाण्याचा प्रवाह निम्म्याने कमी होऊन कालवा फुटण्याचा धोका टळला.

कालवा फुटला असता तर मात्र मोठी दुर्घटना झाली असती व संपुर्ण वस्ती वाहून गेली असती असे येथील नागरिकांनी सांगितले. खेडचे आमदार सुरेश गोरे यांनी कालव्याची पाहणी करून तेथील कुटुंबांची विचारपुस केली व पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना तात्काळ दुरूस्ती करण्याच्या सुचना केल्या. शासनाने आम्हाला घरासाठी दुसरीकडे जागा उपलब्ध करून द्यावी अशी ग्रामस्थांनी मागणी केली आहे. यावेळी पंचायत समिती सभापती सुभद्रा शिंदे, एल, बी तनपुरे, सुभाष हिंगे, शंकर काळे, सुदाम कराळे उपसरपंच नामदेव डुबे, माजी सरपंच द्वारकानाथ टिजगे, पोलिस पाटील उत्तम खंडागळे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com