आरएमडी सिंहगड स्प्रिंगडेल शाळेत शुल्क न भरल्याने मुलांना धमकाविले

राजेंद्रकृष्ण कापसे
शनिवार, 16 जून 2018

वारजे माळवाडी - वारजे येथील आरएमडी सिंहगड स्प्रिंगडेल शाळेच्या प्रशासनाकडून वार्षिक शुल्क एकरकमी फी न भरल्यामुळे विद्यार्थांना नोटीसा देण्यात आल्या. तसेच त्यांना जमिनीवर बसवून ठेवण्यात आले. प्रशासनाकडून मुलांना धमकाविण्याचा आणि वर्गातून बाहेर काढण्याचा प्रकार घडल्याची देखील तक्रार पालकांनी पोलिसांकडे केली आहे.

या शाळेत पहिली ते दहावीपर्यंतचे वर्ग आहेत. मुलांना अशा प्रकारची वागणूक मिळाल्याने त्यांच्या मनात शाळेत जाण्यीच भिती निर्माण झेल्याचे पालकांचे म्हणणे आहे. यासंदर्भात सुमन सिंग, पंकज आपटे, दीपक ढमढेरे, राहुल लबडे, जयश्री भामरे, सोनाली बोंद्रे, पी. व्ही. मुंगसे आदी पालकांनी शाळा प्रशासनावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करणारे निवेदन पोलिस निरीक्षक बाजीराव मोळे यांच्याकडे दिले आहे.

शाळा प्रशासनामार्फत विद्यार्थ्यांचा छळ झाला का, याची संस्थेच्या पातळीवर चौकशी करण्यात येईल. त्यानंतर याबाबतचा अहवाल पोलिसांना दिला जाईल.
- पांडुरंग पांचाळ, रजिस्ट्रार, सिंहगड शिक्षण संस्था
 
Web Title: RMD Springdale school threatens children due to non-payment of fee