...तर पुणे महापालिकेसमोर भीक मागावी लागेल, व्यापारी काय म्हणतायेत वाचा 

समाधान काटे
Tuesday, 28 July 2020

वणाज कॉर्नर ते सुतार दवाखाना दरम्यान रस्ता बंद असल्यामुळे व्यापाऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे.

मयुर कॉलनी (पुणे) : वणाज कॉर्नर ते सुतार दवाखाना दरम्यान रस्ता बंद असल्यामुळे व्यापाऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. त्यामुळे दुकानदारांचे भाडे, कामगारांचा पगार, लाईट बिल व बँकेचे हफ्ते भरणे मुश्किल झाले आहे. रस्ता बंद असल्यामुळे खरेदीसाठी येणाऱ्या ग्राहकांना मार्ग नसल्यामुळे अवघड झाले आहे. त्यामुळे दुकानदाराच्या व्यवसायावर परिणाम झाला आहे. प्रशासनातर्फे लवकरात लवकर रस्ता मोकळा करून द्यावा, ही विनंती व्यापाऱ्यांनी महापालिकेकडे केली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

सुमारे 120 व्यापारी गाळे या ठिकाणी असून सोने, कपडे, स्टेशनरी, स्विट होम, मोबाईल अशा अनेक दुकानदारांना रस्ता बंदीचा फटका बसत आहे. पत्रे लावून रस्ता बंद केल्याने नागरिक भयभीत होत आहेत. 

शहरातील अनेक पेठा सुरू केल्या आहेत. गुजरात कॉलनीतील व्यापाऱ्यांवर अन्याय का? दुकानाचं भाडे दोन ते अडीच लाख रुपये आहे. पुणे महापालिकेला रस्ता चालू करण्यासंदर्भात पत्र देखील दिले आहे. कामगारांचा पगार, लाईट बील देखील निघत नाही. यामध्ये व्यापाऱ्यांची काय चूक आहे. औद्योगिक परिसर, आयटी पार्क चालू झाले. रस्ता लवकर उघडला नाही, तर महापालिकेच्या दारात भीक मागण्याशिवाय पर्याय राहणार नाही.
- सुनील गेहलोत, अध्यक्ष, भाजप व्यापारी आघाडी कोथरूड मतदारसंघ

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

रस्ता बंद असल्याने व्यापाऱ्यांचे दुकानाचे भाडे व कामगारांचा पगार थकला आहे. ग्राहक आत येत नाही, त्यांना वाटते कंटेन्मेंट झोन आहे. त्यामुळे ते आत येण्यास घाबरतात. कोथरूड येथील सहआयुक्त कदम यांना नगरसेवकांमार्फत पत्र दिले आहे. तरी त्यांनी काही कार्यवाही केली नाही. तरी प्रशासनाने लवकरात लवकर रस्ता उघडावा, ही विनंती.
- बाळासाहेब विचारे, खजिनदार, गुजरात कॉलनी व्यापारी संघ कोथरूड 

रस्ता उघडा करायचा आहे. रस्त्याच्या बाजूला पेव्हिंग ब्लॉक बसवण्याचे काम चालू असल्याने रस्ता बंद ठेवण्यात आला आहे.
- संदिप कदम, क्षेत्रीय अधिकारी, कोथरूड 

नियमाप्रमाणे महापालिकेच्या टेंडरमध्ये तो रस्ता घेतला होता. टेंडर निघाल्यानंतर लॉकडाउन सुरू झाले. पोलिस व महापालिका प्रशासनाने रस्ता बंद केला. पुन्हा लॉकडाउन शिथिल झाल्यावर डांबरीकरणाचे काम सुरू झाले. कामगार, साधनसामग्री यांची समस्या निर्माण झाली. त्यामुळे तो रस्ता होण्यासाठी वेळ लागला. काम पूर्ण झाल्यावर रस्ता चालू करण्यात येणार आहे. व्यापाऱ्यांनी नियमांचे पालन करावे
- पृथ्वीराज सुतार, नगरसेवक 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: road between vanaj corner and sutar hospital is closed causing financial loss to traders pune