जलवाहिनीसाठीच्या चरामुळे कडूस-साकुर्डे रस्त्याची वाट 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 29 एप्रिल 2018

कडूस : जलवाहिनीसाठी चर खोदल्याने कडूस (टोकेवाडी) ते साकुर्डी (ता. खेड) या रस्त्याची वाट लागली आहे. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून नुकतेच या रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण करण्यात आले होते. रस्त्याची अल्पावधीत दुरवस्था झाल्याने ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली. 

राजगुरुनगरहून कडूस मार्गे टोकेवाडी, सायगाव, वेताळे, चासकमान धरणाच्या कडेने साकुर्डी मार्गे औदर, वाजवणे, कुडे, चिखलगाव, कळमोडी गावांना दळणवळणाची चांगली सोय होण्यासाठी कडूस-टोकेवाडी ते वेताळे मार्गे साकुर्डी या चौदा किलोमीटर रस्त्याचे रुंदीकरण व डांबरीकरणाचे काम मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून होत आहे. काम पूर्णत्वाच्या मार्गावर आहे. या कामावर आतापर्यंत साडेसात कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. या रस्त्यावर काही शेतकऱ्यांनी जेसीबी मशिनच्या साह्याने जलवाहिनीसाठी चर खोदले आहेत. खोदकाम केल्याने हा रस्ता काही ठिकाणी खराब झाला आहे. जलवाहिनी गाडल्याने काही भागांत उंचवटा तर काही भागात खड्डा झाला आहे. खडी वर आली आहे. त्यामुळे अपघाताची शक्‍यता निर्माण झाली आहे. रात्रीच्या वेळी खड्ड्यांचा अंदाज येत नसल्याने रस्ता वाहतुकीसाठी धोकादायक झाला आहे. 

कोट्यवधी रुपये खर्चून करण्यात आलेल्या या रस्त्याची दुरवस्था झाल्याने कुडे, कळमोडी, वेताळे, साकुर्डी, कहू आदी गावांच्या ग्रामस्थांनी व वाहनचालकांनी नाराजी व्यक्त केली.

Web Title: Road condition worsened after pipe line work in Kadus