ताम्हिणी घाटात रस्‍ता खचला; एकेरी वाहतुक सुरु

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 9 ऑगस्ट 2019

- पुणे-कोलाड रस्‍त्‍यावर ताम्हिणी घाटात निवे (ता.मुळशी) गावच्‍या हद्दीत काळुबाई मंदिराजवळ रस्‍त्‍याला मधोमध भेग पडली.

- ठिकठिकाणी रस्‍ता मोठया प्रमाणात खचल्‍याचे शुक्रवारी (ता.९) सकाळी निदर्शनास आले. त्‍यामुळे एकेरी वाहतुक सुरु आहे.

माले : पुणे-कोलाड रस्‍त्‍यावर ताम्हिणी घाटात निवे (ता.मुळशी) गावच्‍या हद्दीत काळुबाई मंदिराजवळ रस्‍त्‍याला मधोमध भेग पडली. ठिकठिकाणी रस्‍ता मोठया प्रमाणात खचल्‍याचे शुक्रवारी (ता.९) सकाळी निदर्शनास आले. त्‍यामुळे एकेरी वाहतुक सुरु आहे.

रस्‍त्‍यापासून दरीच्‍या बाजुला मोठया प्रमाणात रस्‍ता खचला आहे. दहा-बारा फुट लांब भेगा पडल्‍या आहेत. रस्‍त्‍याच्‍या कडेला तर रस्‍ता सुमारे अर्धा फुट खोल खचला आहे. मुसळधार पावसामुळे रस्‍ता केंव्‍हाही पुर्णपणे खचुन वाहतुक पुर्णपणे बंद होऊ शकते. रस्‍ता खचल्‍याने वाहतुक धोक्‍याची झाली आहे.

परिसरात खुप पाऊस आणि धुके आहे. अंदाज न आल्‍याने मोठे जड वाहन रस्‍त्‍यावरुन चुकीच्‍या बाजुने गेल्‍यास मोठी दुर्घटना घडु शकते. दोन दिवसांपुर्वी जवळच दरड कोसळली होती. त्‍यामुळे तातडीने उपाययोजना करण्‍याची गरजेचे आहे. अशी मागणी राष्‍ट्रवादी कॉंग्रेसचे कार्याध्‍यक्ष अंकुश मोरे, विनायक कोकरे, ताम्हिणीचे उपसरपंच योगेश बामगुडे यांनी केली. पौड पोलिस स्‍थानकाचे वरीष्‍ठ पोलिस निरीक्षक अशोक धुमाळ यांनी वाहन चालकांना सावधानता बाळगण्‍याच्‍या सुचना दिल्‍या आहेत. रस्‍ता खचलेल्‍या ठिकाणी वाहतुकीवर नियंत्रणासाठी पोलिस बंदोबस्‍त ठेवला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: road damaged at tamhini ghat one way route continues