रस्त्यांची खोदाई सुरूच राहणार

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 8 डिसेंबर 2016

पुणे - रस्त्यांच्या कामांना प्राधान्य राहणार नसल्याचे सांगणाऱ्या महापालिका प्रशासनाने आता पुन्हा नवे रस्ते, पदपथांची कामे सुरू असून, त्यावर तब्बल दीडशे कोटी रुपये खर्च करण्यात येणार असल्याचे जाहीर केले. त्यात काही महिन्यांपूर्वी केलेल्या नव्या २५ रस्त्यांचीही दुरुस्ती करण्यात येत आहे. त्यामुळे रस्त्यांच्या कामासाठी महापालिका कोट्यवधी रुपये उधळत असल्याचे या निमित्ताने स्पष्ट झाले आहे. महापालिकेच्या निवडणुका जवळ आल्याने लोकप्रतिनिधी रस्त्यांच्या कामांना प्राधान्य देत असून, या कामांसाठी वर्गीकरणाद्वारे निधी मिळविण्याचा प्रयत्नही ते करीत आहेत.

महापालिका निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर गेल्या सहा महिन्यांत मोठ्या प्रमाणात रस्त्यांची कामे करण्यात आली आहेत. त्यात सर्वाधिक सिमेंट काँक्रीटचे रस्ते उभारण्यात आले. ऐन पावसाळ्यातही काही भागांतील रस्त्यांची कामे करण्यात आली. त्यानंतर काही दिवसांमध्ये रस्ते पूर्णपणे खराब झाल्याचे आढळून आले. आधीच्या कामांचा दर्जा नसल्याची तक्रार नागरिकांनी महापालिका प्रशासनाकडे केली होती. मात्र, त्यानंतर संबंधित ठेकेदारांवर कारवाईचा इशारा देण्याचा सोपस्कार प्रशासनाने केला.

प्रत्यक्षात मात्र, ठेकेदारांवर कोणतीही कारवाई झाली नाही. रस्ते खराब झाल्याचे सांगत महापालिकेने आता शहराच्या विविध भागांतील सुमारे दोनशे रस्त्यांची खोदाई करून कामांचे नियोजन केले आहे. प्रामुख्याने सिमेंट काँक्रिटीकरण, डांबरीकरणाची कामे करण्यात येत आहेत. विशेषतः सोमवार पेठ, रास्ता, नारायण पेठ, येरवड्यातील प्रमुख रस्त्यांची खोदाई सुरू आहे. एकाच वेळी अनेक भागांतील रस्त्यांची खोदाई करण्यात येत असल्याने वाहतूक कोंडी होत आहे. त्या-त्या भागातील रस्त्यांची आवश्‍यक ती कामे केली जात असल्याचा दावा महापालिका प्रशासनाने केला आहे.

महापालिकेच्या पथ विभागाचे प्रमुख राजेंद्र राऊत म्हणाले, ‘‘शहरात ज्या रस्त्यांची कामे करणे आवश्‍यक आहे ती केली जात आहेत. ही कामे वेळेत पूर्ण व्हावीत, यासाठी ठेकेदाराला सूचना केल्या आहेत. त्यामुळे कामे रेंगाळणार नाहीत. नवे रस्ते करतानाच, त्यांची दुरुस्ती, आणि काँक्रिटीकरणाची कामे करण्यात येत आहेत. त्यात काही भागांत पदपथाचीही कामे सुरू आहेत.’’

Web Title: road digging continue