रस्त्यांचे ‘डिजिटल प्रोफाइल’ तयार

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 17 जानेवारी 2017

पुणे - वाहनचालकांना भेडसाविणाऱ्या समस्या आणि अपघातांचे वाढते प्रमाण रोखण्यासाठी ‘ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया’ने (एआरएआय) देशाच्या विविध भागांतील रस्त्यांचे ‘डिजिटल रोड प्रोफाइल’ तयार केले आहे. त्यामुळे वाहननिर्मिती करताना भारतीय वातावरण व रस्त्याशी सुसंगत अशा वाहनांची निर्मिती करणे वाहन उत्पादक कंपन्यांना सोपे जाणार आहे. 

पुणे - वाहनचालकांना भेडसाविणाऱ्या समस्या आणि अपघातांचे वाढते प्रमाण रोखण्यासाठी ‘ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया’ने (एआरएआय) देशाच्या विविध भागांतील रस्त्यांचे ‘डिजिटल रोड प्रोफाइल’ तयार केले आहे. त्यामुळे वाहननिर्मिती करताना भारतीय वातावरण व रस्त्याशी सुसंगत अशा वाहनांची निर्मिती करणे वाहन उत्पादक कंपन्यांना सोपे जाणार आहे. 

ग्रामीण भागाच्या तुलनेत शहरी भागातील रस्त्यांचा दर्जा चांगला आहे. देशभरातील ग्रामीण भागातील बहुतांश रस्त्यांची दुर्दशा झालेली आहे. त्यामुळे वाहनांची देखभाल-दुरुस्ती आणि सुरक्षित प्रवासावर परिणाम होत आहे. त्यातून देशभरात होणारे अपघात व अपघाती मृत्यू यांची संख्या वाढतच चालली आहे. या पार्श्वभूमीवर देशातील रस्त्यांचा दर्जा पाहून वाहननिर्मिती करणे आवश्‍यक असल्याचे मत रस्ते वाहतूक मंत्रालयाचे आहे. त्यानुसार वाहनांची निर्मिती करण्यासाठी ‘एआरआय’ने पुढाकार घेऊन ‘डिजिटल रोड प्रोफाइल’ तयार करून वाहन उत्पादक कंपन्यांना उपलब्ध करून दिले आहे.

एआरएआयने त्यासाठी देशातील सहा हजार चालकांचा सर्व्हे केला. त्यामध्ये सर्व भागातील स्त्री-पुरुष चालकांचा समावेश होता. वाहन चालविताना त्यांना भेडसावणाऱ्या अडचणी त्यांच्याकडून समजावून घेण्यात आल्या. 

चालकांच्या अडचणी घेतल्या जाणून 
परदेशी बनावटीच्या गाड्यांमधील बैठक व्यवस्थेतील फरकामुळे निर्माण होणाऱ्या अडचणी, ब्रेक, क्‍लच आणि रेससाठी फूट कंट्रोल करताना येणाऱ्या मर्यादा, चालकांच्या मानेला व डोक्‍याच्या मागील बाजूस होणाऱ्या वेदनांचा अभ्यास करून वाहनांमध्ये काही बदल सुचविले आहेत. एआरएआयने सुचविलेल्या ‘प्रोफाइल’नुसार वाहन उत्पादक कंपन्यांकडून वाहननिर्मिती करण्यास सुरवात झाली आहे. उत्पादक वाहनांचे मूल्यांकन ‘एआरएआय’कडून केले जात आहे. 
 

गाडी घसरू नये म्हणून ‘एबीएस’ 
दुचाकी वाहने घसरून अपघात होण्याचे प्रमाण अधिक आहे. ते रोखण्यासाठी चारचाकी वाहनांप्रमाणेच दुचाकी वाहनांमध्ये ‘ॲन्टी ब्रेक लॉकिंग सिस्टीम’ (एबीएस) बसविण्याचा निर्णय झाला आहे. त्यानुसार एक एप्रिलपासून उत्पादित होणाऱ्या सर्व नवीन दुचाकींमध्ये ‘एबीएस’चा समावेश असणार आहे. त्यामुळे गाडी घसरण्याचे प्रमाण शून्य टक्‍क्‍यावर येण्यास मदत होणार आहे.

Web Title: road digital profile ready