मांजरी बुद्रुक रेल्वेगेट ते मुळा-मुठा नदीपर्यंतचा रस्ता वाहतुकीस खडतर

ठेकेदाराच्या निष्काळजीपणाला प्रशासनही जबाबदार
road from Manjari Budruk railway gate to Mula-Mutha river Traffic jam pune
road from Manjari Budruk railway gate to Mula-Mutha river Traffic jam pune sakal

मांजरी : येथील रेल्वेगेट ते वाघोली रस्त्याचे रूंदीकरण व काँक्रीटीकरणाचे काम सध्या सुरू आहे. पीएमआरडीएकडून करण्यात येत असलेले हे काम अतिशय संथ गतीने व प्रवाशांच्या सुरक्षेची कोणत्याही प्रकारची काळजी न घेता केले जात आहे. त्यामुळे मार्गावर ठिकठिकाणी वाहतूक कोंडी होत असून अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. रेल्वेगेट ते मुळा-मुठा नदीपर्यंत कंत्राटदाराने ठिकठिकाणी गेल्या अनेक दिवसांपासून रस्ता खोदून ठेवला आहे. मात्र हे काम करताना सुरक्षिततेबाबत कुठल्याही उपाययोजना करण्यात आल्या नाहीत. त्यामुळे रात्री-अपरात्री या ठिकाणी अपघात होण्याचा धोका निर्माण झाला आहे. असे असतानाही कंत्राटदाराच्या या निष्काळजीपणाकडे पीएमआरडीए आणि वाहतूक विभाग दुर्लक्ष करीत असल्याचे दिसते.

अपघात झाल्यावरच ही प्रशासकीय यंत्रणा जागी होणार का, असा प्रश्न प्रवासी जगदीश उंद्रे, रविंद्र घुले, विकास गायकवाड, मारूती पाटील, सीमा जगताप, नितीन कोतवाल, तेजस्विनी आव्हाळे ककःकयांनी केला आहे.मांजरी बुद्रुक येथे रेल्वेगेट ते मांजरी बुद्रुक स्मशानभूमी या सुमारे दोन किलोमीटरच्या अंतरात ठिकठिकाणी रस्ता खोदलेला आहे. विजेच्या डीपी, खांब, अतिक्रमणे हटवलेली नाहीत. सेवा रस्त्याची डागडुजी केलेली नाही. सूचना फलक नाहीत. ब्लिंकर्स लावलेले नाहीत. त्यामुळे प्रवाशांना जीव मुठीत घेऊन व कसरत करीत रस्ता काढावा लागत आहे. सध्या शाळा सुरू झाल्याने या मार्गावर विद्यार्थी व पालकांची या रस्त्यावर मोठी वर्दळ आहे. कामगार व व्यवसायीकही येथून मोठ्या प्रमाणात प्रवास करीत आहेत. मात्र, रस्त्याच्या कामामुळे त्यांना अडखळत प्रवास करावा लागत आहे.

रेल्वेगेट उड्डाणपूलाच्या बाजूने या रस्त्याच्या पहिल्या टप्प्याचे काम के.के. घुले चौक आणि पुढे स्मशानभूमीच्या कॉर्नर पर्यंत कमी अधिक प्रमाणात सुरू आहे, मात्र ठिकठिकाणी काम अर्धवट सोडून देण्यात आले आहे. त्यामुळे तेथे अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. काही ठिकाणी जुन्या रस्त्याला लागून असलेल्या रस्त्याचा भाग जेसीबीने खोदण्यात आला आहे. त्यामुळे सध्या एकाच बाजूने दोन्ही दिशेकडील वाहतूक सुरू आहे. त्यामुळे अपघाताचा धोका निर्माण झाला आहे.

"ठेकेदाराला यापूर्वीच प्रवाशांच्या सुरक्षेबाबत, सूचना फलक, ब्लिंकर्स लावणे व सेवा रस्ते उपलब्ध करून देण्याबाबत सूचना दिली आहे. त्यामध्ये काही कमतरता असेल तर ती करून घेतली जाईल.'

- स्वरूप शिरगुप्पे कनिष्ठ अभियंता, पीएमआरडीए

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com