बारामती: गाडीखेल ते कटफळ स्टेशन रस्त्याचा प्रश्न मार्गी

संतोष आटोळे
गुरुवार, 12 एप्रिल 2018

शिर्सुफळ - गेल्या अनेक वर्षापासुन दुरुस्तीच्या प्रतिक्षेत असलेल्या बारामती तालुक्यातील डोंगराळ भागातील गाडीखेल ते कटफळ स्टेशन रस्त्याच्या दुरावस्थेचा प्रश्न मार्गी लागला आहे. राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातुन सदर रस्त्याच्या साडेचार किलोमीटर अंतराच्या डांबरीकरण कामासाठी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतुन 2 कोटी 38 लाख रुपयांचा निधी मंजुर झाल्याची माहिती जिल्हा परिषद सदस्य रोहित पवार यांनी दिली.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, गाडीखेल येथील ग्रामस्थ दैनंदिन कारणाने तालुक्याचे ठिकाण असलेल्या बारामती तसेच एमआयडीसीकडे जात असतात. यासाठी त्यांना सर्वात जवळचा मार्ग म्हणजे सह्याद्री अॅग्रो - कटफळ स्टेशन मार्ग एमआयडी हा आहे. मात्र गेल्या अनेक वर्षापासुन गाडीखेल पासुन दोनशे मीटर अंतरावर असलेला तीव्र चढ आणि याची झालेली दुरावस्था तसेच कटफळ स्टेशन पर्यत रस्त्याच्या सर्वत्र उखडलेली खडी यामुळे ग्रामस्थांची अत्यंत गैरसोय होत होती. याचा परिणाम ग्रामस्थांना दुसऱ्या मार्गाने प्रवास करावा लागत होता. यामुळे वेळ, पैसा व श्रम व्यर्थ जात होते. यामुळे या मार्गाच्या दुरुस्तीची वारंवार मागणी होत होती.

या पार्श्वभूमिवर खासदार सुप्रिया सुळे, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याप्रश्नावर लक्ष घालुन सदर गाडीखेल ते कटफळ स्टेशन मार्गासाठी 2 कोटी 38 लाख रुपयांचा निधी मंजुर करुन घेतला. याबाबत गाडीखेलचे सरपंच बाळासाहेब आटोळे, उपसरपंच नानासाहेब जगताप, ग्रामपंचायत सदस्य शरद शेंडे, माजी सरपंच तानाजी आटोळे, अनिल आटोळे, दिलीप आटोळे यांनी समाधान व्यक्त केले.

Web Title: road from Gadkhele to Kafal Station Road