गणेशोत्सवापूर्वी खड्डे बुजवावेत

तळेगाव दाभाडे (स्टेशन) - यशवंतनगर ते वराळे फाट्यापर्यंत रस्त्यावर पडलेले खड्डे व पसरलेली खडी.
तळेगाव दाभाडे (स्टेशन) - यशवंतनगर ते वराळे फाट्यापर्यंत रस्त्यावर पडलेले खड्डे व पसरलेली खडी.

तळेगाव दाभाडे (स्टेशन) - सार्वजनिक बांधकाम विभागाने डोळेझाक केल्याने यशवंतनगर ते वराळे चौक आणि पुढे आंबी गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून, सर्वत्र दगड व खडी पसरली आहे. गणेशोत्सवापूर्वी खड्डे बुजवावेत, अशी मागणी वराळे ग्रामस्थ आणि जागृत नागरिक मंच यांनी केली आहे.

मागील वर्षी या रस्त्याचे काही ठिकाणी काँक्रिटीकरण केले. इंद्रायणी मंगल कार्यालयापासून पुढे डांबरीकरण केले. मात्र, संततधार पावसामुळे ठिकठिकाणी खड्डे पडून रस्ता उखडला आहे. हा रस्ता अतिशय वर्दळीचा आहे.

एमआयडीसीकडे जाणारी अवजड वाहने, गवळी, कामगार, विद्यार्थी या रस्त्याचा वापर करतात. दुचाकीस्वारांना व पादचाऱ्यांना खड्डे चुकविताना कसरत करीत जावे लागते. खड्ड्यात पाणी साचत असल्याने खड्ड्याच्या खोलीचा अंदाज येत नाही. त्यामुळे लहानमोठे अपघात घडतात. परिसरात सुमारे ८० गणेश मंडळे आहेत. 

गणेश विसर्जनाच्या दिवशी सर्व गणपती मंडळाच्या मिरवणुका व घरगुती गणपती या रस्त्याने आंबी पुलाजवळील इंद्रायणी नदीवर जातात. त्यामुळे गणेशमूर्तींना विसर्जनासाठी नेताना खड्यात अडखळून मूर्ती भंगण्याचे प्रकार घडण्याची शक्‍यता नागरिकांनी व्यक्त केली आहे. तरी सार्वजनिक बांधकाम विभागाने या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करावी. माजी उपसरपंच सचिन शेलार म्हणाले, की इंद्रायणी मंगल कार्यालय ते वराळे चौक व रूडसेट संस्थेपर्यंत या रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्याची नितांत गरज आहे. कारण या रस्त्यावर नेहमी पाणी साचत असल्याने वाहनांच्या वर्दळीने खड्डे पडून खडी रस्त्यावर पसरते. दुचाकी घसरून अपघात घडतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com