खड्ड्यांमुळे वाहनचालक त्रस्त

बाणेर - मुंबई-बंगळूर महामार्गाजवळील सेवारस्त्याची दूरवस्था झाली आहे.
बाणेर - मुंबई-बंगळूर महामार्गाजवळील सेवारस्त्याची दूरवस्था झाली आहे.

बालेवाडी - बाणेर येथील मुंबई- बंगळूर महामार्गाजवळील सेवारस्त्यावर पडलेल्या असंख्य खड्ड्यांमुळे वाहनचालकांसह नागरिक त्रस्त झाले आहेत. येथून मार्गक्रमण करताना दुचाकीस्वारांना चांगलीच कसरत करावी लागत आहे. प्रशासनाने तातडीने खड्ड्यांची दुरुस्ती करावी, अशी वाहनचालकांची मागणी आहे.

बाणेर येथील मुरकुटे उद्यानाकडून मुंबई-बंगळूर महामार्गाकडे जाण्यासाठी एक सेवारस्ता आहे. या रस्त्याजवळच एक लहानशी मोरी असून, येथूनच महामार्गाच्या पलीकडील सेवारस्त्याला जाण्यासाठी दुचाकीस्वार याचा वापर करतात. रस्त्याच्या पलीकडील सेवारस्ता व ही लहानशी मोरी यामध्ये असंख्य लहान मोठे खड्डे पडले आहेत.

मोरीच्या पलीकडचा सेवारस्ता पाषाण-सूस खिंडीला जातो, तर दुसरीकडे म्हाळुंगे-हिंजवडीला हा रस्ता जात असल्याने येथे नेहमीच वर्दळ असते. बाणेरवरून या ठिकाणी ये-जा करण्यासाठी हा जवळचा रस्ता असल्याने एवढे खड्डे पडूनही नागरिक या रस्त्याचा वापर करतात. पथ विभागाशी या संदर्भात विचारणा केली असता, या रस्त्याची देखभाल राष्ट्रीय महामार्ग विभागाकडे असल्याचे सांगण्यात आले. हे देखभालीचे काम रिलायन्स कंपनीकडे दिले असल्याचे सांगण्यात आले.

सध्या पावसामुळे महामार्गावर जे मोठे खड्डे पडले आहेत ते बुजविण्याचे काम सुरू असून, पुढील तीन-चार दिवसांत सेवारस्त्याच्या दुरुस्ती काम सुरू करणार आहोत.
- रिलायन्सचे प्रतिनिधी

या ठिकाणावरून ये-जा करताना रोज आम्हाला कसरत करावी लागते, तरी प्रशासनाने तातडीने खड्डे बुजवून या त्रासातून सुटका करावी. 
- देविदास जगताप, रहिवासी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com