रस्ता नाही तर करही भरणार नाही...

ज्या करामधून आम्हा नागरीकांना रस्ते, वीज, पाणी या मुलभूत सुविधा महापालिका देते. त्यासाठीच आजपर्यंत दर वर्षी प्रामाणिकपणे कर भरला आहे.
Road
RoadSakal
Summary

ज्या करा मधून आम्हा नागरीकांना रस्ते, वीज, पाणी या मुलभूत सुविधा महापालिका देते. त्यासाठीच आजपर्यंत दर वर्षी प्रामाणिकपणे कर भरला आहे.

मोशी - ज्या करामधून (Tax) आम्हा नागरीकांना रस्ते, (Road) वीज, (Electricity) पाणी (Water) या मुलभूत सुविधा (Facility) महापालिका देते. त्यासाठीच आजपर्यंत दर वर्षी प्रामाणिकपणे कर भरला आहे. मात्र, पालिकेने (Municipal) आमच्या सफायर हौसिंग सोसायटीकडे येणारा रस्ता अद्यापही बनविलेला नाही. जर कर भरुनही रस्ता मिळत नाही तर आता महापालिका जोपर्यंत हा रस्ता बनवत नाही, तोपर्यंत आम्हीही कर भरणार नाही. अशी भूमिका मोशीतील सफायर हौसिंग सोसायटीमधील रहिवाशांनी घेतली असून तसे सोसायटीधारकांनी महापालिका आयुक्त राजेश पाटील यांना कळविले आहे.

'सफायर सोसायटीधारक 2017 पासून येथे राहत असून देहूआळंदी रस्त्यावरील लक्ष्मी चौकापासून सोसायटीकडे येणारा रस्ता अजूनही अर्धवट आहे.

21 मार्च 2022 रोजी थकबाकीदार यादी सोबत पाणी पुरवठा बंद करण्यात येणार असल्याची नोटीस सोसायटीधारकांना मिळाली. सोसायटीतील 60% हून अधिक सदनिकाधारकांनी मिळकत कर भरला आहे, 25 ते 30% भरला नाही. सोसायटीधारक 2017 पासून येथे राहत असून गेली 5 वर्ष या रस्त्यापासून वंचित आहेत.

आता जर पालिका 188 रहिवाशी पैकी फक्त 40% रहिवाशींनी मिळकत कर भरला नाही म्हणून पाणी पुरवठा बंद करणार अशी नोटीस पाठवते, तर मग 60% रहिवाशींनी चांगल्या रस्त्याची मागणी का करू नये?

असा प्रश्न सोसायटीधारकांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे जर 30 जूनच्या आधी या रस्त्याची दुरुस्ती आणि मंजूर केलेल्या रस्त्याचे काम सुरु न केल्यास सन 2022-23 चे मिळकत कर रहिवाशी भरणार नाहीत. रस्ता नाही तर कर नाही.

हे टोकाचे पाऊल उचलायला पालिकेचा भोंगळ कारभार कारणीभूत असून यापूर्वीही या रस्त्यासाठी अनेक निवेदन दिली असल्याचे सोसायटीच्या वतीने कळविले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com