मोशीतील पथदिवे ऐन दिवाळीत बंद

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 28 ऑक्टोबर 2016

मोशी - दिव्यांचा सण समजला जाणाऱ्या ऐन दीपावली सणामध्येच मोशी प्राधिकरणातील संतनगरमधील रस्त्यांवरील पथदिवे संबंधित कर्मचाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे बंद आहेत.

मोशी - दिव्यांचा सण समजला जाणाऱ्या ऐन दीपावली सणामध्येच मोशी प्राधिकरणातील संतनगरमधील रस्त्यांवरील पथदिवे संबंधित कर्मचाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे बंद आहेत.

त्यामुळे घरासमोर अंधार पडत असल्याने स्थानिक नागरिकांनी संताप व्यक्त करून ताबडतोब हे पथदिवे सुरू करण्याची मागणी केली आहे. दीपावली हा सण दिव्यांचा समजला जातो. नागरिकांनी आपापल्या घरांवर आकाशदिव्यांबरोबरच दीपमाळांची रोषणाई केली आहे. मात्र महापालिकेच्या विद्युत विभागाच्या दुर्लक्षामुळे मोशी प्राधिकरणातील संतनगरमधील संत गजानन चौक ते उपप्रादेशिक परिवहन कार्यालय याबरोबरच अन्य रस्त्यांवरील काही पथदिवे बंद आहेत. या रस्त्याच्या दुतर्फा नागरिकांची घरे असून, नेमका त्या घरांसमोर तसेच रस्त्यावर अंधार पडत आहे.

Web Title: Road lights off in Moshi

टॅग्स