रिंगरोडभोवती विणणार अंतर्गत रस्त्यांचे जाळे

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 20 मे 2018

पीएमआरडीएकडून 128 किलोमीटर लांबीचा रिंगरोड विकसित करण्यात येणार आहे. सात महामार्गांना जोडणारा हा रिंगरोड साठहून अधिक गावांमधून जाणार आहे. या रस्त्याच्या दोन्ही बाजूस जवळपास आठ नगररचना योजना राबविण्यात येणार आहेत. हा रिंगरोड पूर्ण झाल्यानंतर अडीच लाख वाहनांकडून त्याचा वापर होईल, असा अंदाज पीएमआरडीएकडून व्यक्त करण्यात येत आहे.

पुणे : पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाकडून (पीएमआरडीए) विकसित करण्यात येत असलेल्या रिंगरोडला जवळपास 45 ठिकाणांहून कनेटिव्हीटीसाठी रस्ते दिले जाणार आहेत. यासाठी सुमारे अडीचशे कोटी रुपये खर्च केला जाणार असून, त्यामुळे चार तालुक्‍यांतील साठ गावांचा विकास होण्यास मदत होणार आहे. 

पीएमआरडीएकडून 128 किलोमीटर लांबीचा रिंगरोड विकसित करण्यात येणार आहे. सात महामार्गांना जोडणारा हा रिंगरोड साठहून अधिक गावांमधून जाणार आहे. या रस्त्याच्या दोन्ही बाजूस जवळपास आठ नगररचना योजना राबविण्यात येणार आहेत. हा रिंगरोड पूर्ण झाल्यानंतर अडीच लाख वाहनांकडून त्याचा वापर होईल, असा अंदाज पीएमआरडीएकडून व्यक्त करण्यात येत आहे. रिंगरोडच्या दोन्ही बाजूस सर्व्हिस रोड विकसित करण्यात येणार आहे. या रस्त्याला कनेटिव्हीटी असावी, यासाठी प्रादेशिक विकास आराखड्याबरोबरच शिवार रस्ते, जिल्हा परिषदेचे रस्ते असे सुमारे 45 जोडरस्ते विकसित करण्यात येणार आहेत. त्यासाठी सुमारे अडीचशे कोटी रुपये खर्च अपेक्षित धरण्यात आला आहे.

गरजेनुसार या रस्त्यांच्या संख्या वाढण्याची शक्‍यताही व्यक्त करण्यात येत आहे. हे जोडरस्ते देण्यामागे रिंगरोडमुळे आजूबाजूच्या गावांचा विकास गतीने व्हावा, हा हेतू असल्याचे पीएमआरडीएकडून सांगण्यात आले. 
 

Web Title: The road network under the wings around the ringroad