रस्ता एक किलोमीटर; खड्डे २६

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 22 ऑगस्ट 2018

वाल्हेकरवाडी - रावेत-वाल्हेकरवाडी मुख्य रस्त्याची पावसामुळे अत्यंत दयनीय अवस्था झाली. अवघ्या एक किलोमीटरमध्ये तब्बल २६ खड्डे पडले आहेत. अशा खड्डेमय रस्त्यावरून प्रवास करणे जिकिरीचे जात असून, लवकरात लवकर हे खड्डे बुजवावेत, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. 

केवळ मुख्य रस्ताच नाही, तर अंतर्गत रस्त्यांचीही दुरवस्था झाली आहे. पावसाळा सुरू होण्यापूर्वी डांबरीकरण करण्याऐवजी केवळ डागडुजी केली गेल्यानेही अशी परिस्थिती निर्माण झाल्याची नागरिकांची तक्रार आहे. या खड्ड्यांमध्ये पाणी साचत असल्याने त्याचा नेमका अंदाज येत नाही. त्यामुळे अपघाताचे अनेक प्रसंग निर्माण होत असल्याचे सांगितले जाते. त्याव्यतिरिक्त रस्त्यांचा योग्यरीत्या विकास न झाल्याने अनेक सखल भागातही पाणी साचत असल्याने या भागातील विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, महिलांना जीव मुठीत घेऊन रस्त्याने ये-जा करावी लागते. याकडे पालिका प्रशासन जाणीवपूर्वक डोळेझाक करीत असल्याचा नागरिकांचा आरोप आहे. 

परिसरातील बहुतांश रस्त्यांचे डांबरीकरण झालेले नाही. त्यातच सध्या सातत्याने पाऊस पडत आहे. अशा अवस्थेत नागरिकांनी रस्त्याने कसे चालायचे, असा प्रश्‍न विचारला जात आहे. 

पक्‍क्‍या रस्त्याचे काम हाती घेण्यात आले होते; पण सतत पडणाऱ्या पावसामुळे काम थांबविले आहे. रावेत-वाल्हेकरवाडी रस्त्याचे डांबरीकरण केले आहे. तथापि, बाजूलाच प्रलंबित रस्त्याचे काम सुरू असल्यामुळे पाणी साचून राहत आहे. 
- करुणा चिंचवडे,  नगरसेविका

Web Title: Road one kilometer; Pothole 26