अखेर चार महिन्यांनंतर रस्तेदुरुस्ती

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 21 ऑक्टोबर 2016

पुणे - खराब रस्त्यांमुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात झालेल्या त्रासानंतर अखेर चार महिन्यांनी पुणे कॅंटोन्मेंट बोर्ड प्रशासनाने रस्त्यांच्या दुरुस्तीचे
काम हाती घेतले आहे. कॅंटोन्मेंट प्रशासनाबरोबरच लष्करानेही अंतर्गत भागातील रस्ते दुरुस्तीच्या कामाला गती दिली आहे.

त्यामुळे कॅंटोन्मेंटवासीयांसह वाहनचालकांनीही अक्षरशः सुटकेचा निःश्‍वास टाकला आहे.

पुणे - खराब रस्त्यांमुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात झालेल्या त्रासानंतर अखेर चार महिन्यांनी पुणे कॅंटोन्मेंट बोर्ड प्रशासनाने रस्त्यांच्या दुरुस्तीचे
काम हाती घेतले आहे. कॅंटोन्मेंट प्रशासनाबरोबरच लष्करानेही अंतर्गत भागातील रस्ते दुरुस्तीच्या कामाला गती दिली आहे.

त्यामुळे कॅंटोन्मेंटवासीयांसह वाहनचालकांनीही अक्षरशः सुटकेचा निःश्‍वास टाकला आहे.

कॅंटोन्मेंटच्या हद्दीतील बहुतांश रस्त्यांवर पाच-सहा महिन्यांपासून मोठ्या प्रमाणात खड्डे पडले होते. बोर्ड प्रशासनाच्या उदासीनतेमुळे पावसाळ्यापूर्वी रस्त्यांची दुरुस्ती झाली नाही. त्यामुळे जोरदार पावसात वाहनचालकांना खड्ड्यात रस्ता शोधण्याची वेळ आली होती. ईस्ट स्ट्रीट, महात्मा गांधी रस्ता, डॉ. बाबासाहेब आंबेडकर रस्ता, शंकरशेठ रस्ता, कोंढवा रस्ता, वानवडी, घोरपडी, क्वीन्स गार्डन रस्ता, सोलापूर रस्ता आणि सोलापूर बाजार परिसरातील रस्त्यांची दयनीय अवस्था झाली होती. कॅंटोन्मेंटवासीय आणि वाहनचालकांच्या दृष्टीने महत्त्वाच्या असणाऱ्या या समस्येचा "सकाळ'ने सातत्याने पाठपुरावा केला.

अखेर बोर्ड प्रशासनाने आठवडाभरापूर्वी नागरी भागातील रस्ते दुरुस्तीचे काम हाती घेतले. आत्तापर्यंत कोंढवा रोड, कॅनिंग रोड, घोरपडी, वानवडी, जीटी, ईस्ट स्ट्रीट या महत्त्वाच्या ठिकाणच्या रस्त्यांवर डांबरीकरण करण्यास प्रशासनाने प्राधान्य दिले आहे. किमान प्रमुख रस्त्यांच्या दुरुस्तीचे काम तातडीने मार्गी

लावल्यामुळे वाहनचालकांना दिलासा मिळाला आहे. लष्करी प्रशासनानेही कॅंटोन्मेंट परिसरातील लष्करी भागातील रस्ते दुरुस्ती करण्यास सुरवात केली आहे. शुक्रवारी जनरल बेऊर रोड भागातील खराब रस्त्यांची दुरुस्ती करण्यात आली. मात्र, अजूनही सोलापूर रस्ता, रेसकोर्स भोवतीचा रस्ता आणि अंतर्गत भागातील काही रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे दिसत आहेत.

या संदर्भात प्रशासनाच्या अभियांत्रिकी विभागाच्या अधिकाऱ्यांनी माहिती दिली. पाऊस थांबल्यानंतर कॅंटोन्मेंट प्रशासनाने नागरी भागातील रस्त्यांच्या दुरुस्तीचे काम तत्काळ हाती घेतले. प्रमुख रस्त्यांचे काम पूर्ण झाले आहे, उर्वरित रस्त्यांचीही लवकरच दुरुस्ती होईल. सार्वजनिक बांधकाम विभाग आणि लष्कराच्या हद्दीत येणाऱ्या रस्त्यांचीही तत्काळ दुरुस्ती व्हावी, यासाठी त्यांच्याकडे पाठपुरावा करणार असल्याचे बोर्ड प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

Web Title: road repairing by administrative