रस्ता दुरुस्तीसाठी सरसावले तरुण

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 3 नोव्हेंबर 2019

उरुळी कांचन ते जेजुरी या राज्य मार्गावर उरुळी कांचन ते वाघापूर दरम्यान खड्डे पडल्याने रस्त्याची अवस्था अतिशय खराब झाली आहे. शिंदवणे घाटात तर रस्त्याची दुरवस्था झाली आहे. दुचाकीवरून अथवा छोट्या चारचाकी वाहनातून प्रवास करणे कठीण बनले आहे. मात्र, उरुळी कांचन (ता. हवेली) येथील उरुळी कांचन ग्रामस्वच्छता अभियान या ग्रुपने रस्त्याच्या दुरवस्थेबद्दल प्रशासनावर अथवा राजकीय नेत्यांवर टीका न करता, रविवारी (ता. 3) सकाळी दोन तासाहून अधिक काळ हातात कुदळ, फावडे घेत रस्त्यावरील खड्डे बुजविले. तसेच साईडपट्टी दिशादर्शक चुना लावणे, धोकादायक वळणावर पडलेल्या ओघळी दुरुस्त करण्याचा प्रयत्न केला.

 

उरुळी कांचन (पुणे) : उरुळी कांचन ते जेजुरी या राज्य मार्गावर उरुळी कांचन ते वाघापूर दरम्यान खड्डे पडल्याने रस्त्याची अवस्था अतिशय खराब झाली आहे. शिंदवणे घाटात तर रस्त्याची दुरवस्था झाली आहे. दुचाकीवरून अथवा छोट्या चारचाकी वाहनातून प्रवास करणे कठीण बनले आहे. मात्र, उरुळी कांचन (ता. हवेली) येथील उरुळी कांचन ग्रामस्वच्छता अभियान या ग्रुपने रस्त्याच्या दुरवस्थेबद्दल प्रशासनावर अथवा राजकीय नेत्यांवर टीका न करता, रविवारी (ता. 3) सकाळी दोन तासाहून अधिक काळ हातात कुदळ, फावडे घेत रस्त्यावरील खड्डे बुजविले. तसेच साईडपट्टी दिशादर्शक चुना लावणे, धोकादायक वळणावर पडलेल्या ओघळी दुरुस्त करण्याचा प्रयत्न केला.

या रस्त्याचे काम दोन वर्षांपूर्वी हायब्रीड इम्युनिटी या योजनेतून मंजूर झाले असले तरी, काम अतिशय संथ गतीने चालू आहे. महिनाभरापूर्वी शिंदवणे घाटातील रस्त्यात मोटारसायकल आदळून झालेल्या अपघातात, उरुळी कांचन येथील एका महिलेला आपले प्राणही गमवावे लागले होते. या प्रार्श्वभूमीवर उरुळी कांचन ग्रामस्वच्छता अभियान या ग्रुपच्या पन्नासहून अधिक सदस्यांनी रविवारी सकाळी कुदळ, फावडे घेत रस्त्यावरील खड्डे बुजविले. तसेच साईडपट्टी दिशादर्शक चुना लावणे, धोकादायक वळणावर पडलेल्या ओघळी दुरुस्त करण्याचा प्रयत्न केला.

उरुळी कांचन ग्रामस्वच्छता अभियान या ग्रुपचे संस्थापक संतोष चौधरी यांच्यासह त्यांचे सहकारी शैलेश गायकवाड, किरण वांझे, महादेव काकडे, मनोज महाडीक, राजेंद्र ढमढेरे, राजू नवले, हृषिकेश भालेराव, सचिन ढोके,अक्षय कुंजीर, रमेश महाडीक, संजय गावंगे, केशव कांचन, मयूर कांचन, भारत कोलते, पत्रकार रामचंद्र चौधरी, लालचंद कुंवर, राजाराम कुंजीर, प्रतीक करे, भाऊसाहेब महाडीक, अनिल कुलाळ, दादा बगाडे, जय चौधरी, ओम नवले, यश महाडीक, श्‍लोक महाडीक आदींनी श्रमदान केले.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Road Repairing By Youth