#RoadSefty ‘द्रुतगती’ सुरक्षिततेच्या दिशेने

सकाळ वृत्तसेवा 
सोमवार, 19 ऑगस्ट 2019

पुणे - पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरील अपघातांची संख्या काही प्रमाणात कमी झाल्याचे पोलिसांच्या आकडेवारीतून दिसत आहे. प्राणांतिक अपघातांमध्ये मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या घटली आहे. पोलिसांची काटेकोर कारवाई आणि मार्गाची नियमितपणे होत असलेली देखभाल दुरुस्ती, यामुळेही काही प्रमाणात हा मार्ग सुरक्षित होत आहे.

गेल्या तीन वर्षांपासून अपघातांची संख्या काही प्रमाणात घटत आहे, ही समाधानाची बाब आहे. परंतु, ही संख्या अजून घटावी, यासाठी महामार्ग पोलिसांचे प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी आता तंत्रज्ञानाचीही मदत घेण्यात येत आहे. त्यामुळे नजीकच्या काळात अपघात अजून घटतील.
- विजय पाटील, अधीक्षक, महामार्ग पोलिस 

पोलिसांचे प्रयत्न आणि काही प्रमाणात ‘एमएसआरडीसी’ने सुधारणा केल्या आहेत. त्यामुळे अपघात घटत आहेत. परंतु, ब्लॅक स्पॉट्‌स अजूनही कमी होणे गरजेचे आहे. त्यासाठी ‘आयटीएमएस’चा वापर केला पाहिजे. 
- तन्मय पेंडसे, द्रुतगती मार्गाचे अभ्यासक 

व्यवसायानिमित्त मला आठवड्यातून दोन वेळा मुंबईला जावे लागते. या रस्त्यावर वाहनांच्या वेगावर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसही अनेक ठिकाणी दिसतात. मात्र, या रस्त्यावर सायंकाळी आणि पहाटेच्या वेळी दृश्‍यमानता कमी होते. त्याचा विचार व्हावा. 
- चिराग जैन, प्रवासी

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Road Sefty Expressway Secure