बारामती - सिध्देश्वर निंबाडी ते खडकी मार्गाची दुरावस्था

संतोष आटोळे
मंगळवार, 17 एप्रिल 2018

शिर्सुफळ (पुणे) : सिध्देश्वर निंबोडी (ता.बारामती) ते खडकी (ता.दौंड) येथील पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गाकडे जाणाऱ्या मार्गांची प्रचंड दुरावस्थी झाली आहे. यामुळे सदर ठिकाणी जाण्यासाठी सिध्देश्वर निंबोडीसह आसपासच्या गावांमधील ग्रामस्थांना भिगवण किंवा पारवडी मार्गाचा अवलंब करावा लागत असल्याने वेळ व पैशाची हानी होत आहे. यामुळे या मार्गाची दुरुस्ती करुन ग्रामस्थांची गैरसोय टाळण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. 

याबाबत सविस्तर माहिती अशी की, सिध्देश्वर निंबोडी येथुन पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील खडकी (ता.दौंड) या ठिकाणी जाण्यासाठी फक्त पाच किलोमीटर अंतराचा मार्ग आहे. यातील गावापासुन सुमारे एक किलोमीटर अंतराचे डांबरीकरण झालेले आहे. परंतू उर्वरित अंतराची एवढी दुरावस्था झालेली आहे की, प्रवासी वेळ आणि पैसै गेला तरी चालेले म्हणत सुमारे पंधरा किलोमीटर अंतर कापत भिगवण येथुन खडकीकडे जातात.

एवढेच काय तर रस्त्याच्या दुरावस्थेमुळे या मार्गावरुन पंढरपुरकडे जाणाऱ्या सासवड येथील चांगटेश्वराच्या पालखीनेही आपला मार्ग बदलला आहे.यामुळे ग्रामस्थांना वारकरी सेवेला मुकावे लागले आहे.यामुळे या मार्गाच्या दुरुस्ती केल्यास प्रवाशांची गैरसोय टळणार आहे. या मार्गावरुन प्रवास केल्यास 10 किलोमीटरचे अंतर कमी होउन वेळ आणि पैशाची बचत होणार आहे. यामुळे रस्त्याच्या तात्काळ दुरुस्तीची मागणी सिध्देश्वर निंबोडीच्या सरपंच मनिषा फडतरे, उपसरपंच नितीन विधाते, माजी सरपंच किशोर फडतरे, सुनिल उदावंत, संतोष नगरे, धनंजय धुमाळ, शंकर कन्हेरकर, रमेश कन्हेरकर यांनी सांगितले.

याबाबत जिल्हा परिषद सदस्य रोहित पवार म्हणाले, या मार्गाच्या दुरावस्थे मुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे.याबाबत खासदार सुप्रिया सुळे, आमदार अजित पवार यांच्या माध्यमातुन तसेच जिल्हा परिषदेकडुन निधी आणुन रस्ता दुरुस्तीसाठी पाठपुरवा करु, असे जिल्हा परिषद सदस्य रोहित पवार यांनी सांगितले. 

Web Title: road is in very bad condition at siddheshwar to nimbadi in baramati