अखेर निलायम पुलाजवळील धोकादायक रस्त्याचे काम लागले मार्गी...

road111.jpg
road111.jpg
पुणे : सर्वे नंबर १३२ सिंहगड रोडवर निलायम पुलाच्या खाली तीन ठिकाणी महापालिकेकडून रस्त्याचे खोदकाम करण्यात आले होते. महावितरणच्या केबल नेण्यासाठी याठिकाणी रस्ता खोदण्यात आला होता. केबलचे काम झाल्यानंतर रस्त्याचे खोदलेला रस्ता दुरूस्त करण्याचे अपेक्षित होते. मात्र, महापालिकेकडून तब्बल बारा दिवसांनंतर रस्ता दुरूस्त करण्यात आलेला नव्हता. शहरातील सिंहगड रोड हा मुख्य रस्ता आहे. याठिकाणी वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणात असते. रस्त्यावरील डांबर पूर्णपणे उखडलेले होते.  हा रस्ता अद्यापही दुरूस्त झालेला नव्हता. रस्ता दुरूस्त झाला नाहीतर याठिकाणी अपघात होण्याची शक्यता आहे.
याठिकाणी रस्ता लवकरात लवकर दुरूस्ती करणे अपेक्षित असताना महापालिकेकडून रस्ता तसाच ठेवण्यात आलेला होता. येथील वाहनचालकांनी या रस्त्याच्या दुरूस्तीची मागणी केलेली होती. सकाळने यासंबंधीची बातमी प्रसारित केल्यानंतर महापालिका प्रशासनाने अखेर या बातमीची दखल घेत या रस्ता दुरूस्त करण्यात आला आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 
सकाळच्या बातमीनंतर महापालिका प्रशासनाला जाग आली आणि याठिकाणी ठिकठिकाणी जे खड्डे पडले होते आता पूर्णपणे बूजवून रस्ता पूर्ववत केलेला आहे. रस्ता दुरूस्त केल्यामुळे वाहनचालकांना आता अडथळा येणार नाही. कुठल्याही वाहनाचालकांना अपघाताचा धोका याठिकाणी होणार नाही. नागरिकांकडून महापालिकेच्या या कामाबद्दल आभार व्यक्त करण्यात येत आहे. तसेच सकाळचे आभार मानण्यात येत आहेत.
"बारा दिवसांनंतर महापालिकेकडून काल या रस्त्याची दुरूस्ती करण्यात आली. आता आम्हाला कुठलाही अडथळा येणार नाही. सकाळचे आभार.
-संदिप काळे, नागरिक 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com