तुटलेले गतिरोधक व उघडे चेंबर ठरताहेत धोकादायक

रमेश मोरे
सोमवार, 2 एप्रिल 2018

रस्त्याकडेला पदपथावरील उघडे चेंबर नागरीक,लहान मुले व जेष्ठांसाठी धोकादायक ठरत आहेत. तर उघड्या चेंबरमध्ये कचरा अडकुन ते तुंबण्याचे प्रकारही घडत आहेत. येथील दत्तमठ रस्ता, ममता नगर पथपथावरील तीन चेंबर गेली अनेक दिवसांपासुन झाकणाविना उघडे आहेत.

जुनी सांगवी (पुणे) : जुनी सांगवी परिसरात झाकण नसलेले उघडे चेंबर व तुटलेले गतिरोधक धोकादायक ठरत आहेत.

रस्त्याकडेला पदपथावरील उघडे चेंबर नागरीक,लहान मुले व जेष्ठांसाठी धोकादायक ठरत आहेत. तर उघड्या चेंबरमध्ये कचरा अडकुन ते तुंबण्याचे प्रकारही घडत आहेत. येथील दत्तमठ रस्ता, ममता नगर पथपथावरील तीन चेंबर गेली अनेक दिवसांपासुन झाकणाविना उघडे आहेत. तर पी. डब्ल्यु. डी. वसाहती जवळ डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातील वळणावर पाणी पुरवठा करण्यात येणा-या पाईप लाईन व्हॉल्वच्या चेंबरवर उघडा आहे.

येथील चेंबरचे झाकण असुनही बाजुला ठेवण्यात आल्याने अपघाताचा धोका संभवतो. याच चौकात सांगवी पोलिस चौकी समोरील रस्त्यावरील गतिरोधक ठिकठिकाणी तुटला असल्याने गाड्या घासणे अडकणे असे प्रकार घडत आहेत. गतिरोधकाच्या पुढे उतार रस्ता सखल भाग असल्याने अनेकदा येथे किरकोळ अपघातही यापुर्वी येथे घडले आहेत. प्रशासनाकडुन या सर्व ठिकाणच्या दुरूस्त्या कराव्यात अशी मागणी नागरीकांमधुन होत आहे.

Web Title: road work in Sangvi