शिवणे-कोंढवे-धावडे रस्त्याचे काम समन्वयाने होणार

राजेंद्रकृष्ण कापसे
सोमवार, 27 ऑगस्ट 2018

कोंढवे धावडे (पुणे) : सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने शिवणे येथील शिंदेपूल ते खडकवासला फाट्या पर्यंत रस्त्याचे काम सुरू आहे. यातील शिवणे- उत्तमनगर पर्यंत महापालिका हद्दीत कामे सूर आहेत. ती करताना महापालिकेच्या समन्वयाने करवित. असे आज महापालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पाहणी केल्यावर असे यावेळी ठरले.

दरम्यान, खासदार सुप्रिया सुळे यांनी महापालिका आयुक्त आणि इतर अधिकाऱ्यांसोबत महापालिकेत नुकत्याच घेतलेल्या बैठकीनुसार ही पाहणी करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक सचिन दोडके, नगरसेवक दिलीप बराटे, विकास दांगट, सुरेश गुजर, अतूल दांगट, अमोल कारले, त्रिंबक मोकाशी यांच्यासह सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता नकुल रणसिंग, शाखा अभियंता प्रशांत काकडे, पुणे महापालिकेचे पथ विभागाचे कार्यकारी अभियंता अभिजीत डोंबे, उपअभियंता उमाकांत डिग्गीकर, कनिष्ठ अभियंता महेश गायकवाड, तिखे आदी यावेळी उपस्थित होते.

शिवणे शिंदेपूल ते कोंढवा गेट क्रमांक 10 दरम्यान सुरू असलेल्या रस्त्याच्या कामादरम्यान पाण्याचे नैसर्गिक स्रोत बंद होता कामा नयेत. याशिवाय जलवाहिन्या आणि ड्रेनेज वाहिन्या आहेत. त्यांचे योग्य नियोजन व्हावे. काम योग्य पद्धतीने आणि कोणत्याही मूळ स्रोताचे नुकसान न होता सर्व वाहिन्याचे योग्य नियोजन व्हावे. त्यासाठी महापालिका आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने एकत्र येऊन समन्वयाने काम करावे, असा निर्णय यावेळी घेण्यात आला.

Web Title: road work of shivane kondhave dhawade is with cooperation