संततधार पावसाने रस्त्याची पुन्हा चाळण

रमेश मोरे
बुधवार, 22 ऑगस्ट 2018

जुनी सांगवी : जुनी सांगवी येथे संततधार पावसामुळे मुळानदी किनारा रस्त्यावर खड्डे पडुन रस्त्याची चाळण झाली आहे. नागरिकांना खड्डे, रस्त्यावर पसरलेली खडी यातुन रहदारी करण्यासाठी कसरत करावी लागत आहे. याचबरोबर मधुबन सोसायटी अंतर्गत रस्त्यांच्या संथ गतीने सुरू असलेल्या काम, पद पथांच्या कामामुळे मधुबन रहिवाशांना रहदारीसाठी अडचणींचा सामना करावा लागत आहे. मुळानदी किनारा रस्त्याचे एप्रिल मे महिन्यादरम्यान भुमिगत ड्रेनेज लाईनचे काम झाले होते. यानंतर पालिका स्थापत्य विभागाकडुन खडी व डांबरीकरण करून केलेल्या कामाची दुरूस्ती केली होती.

जुन महिन्यातील मोठ्या पावसाने पुन्हा येथील रस्ता खचुन खड्डे पडले होते या दरम्यान स्थापत्य विभागाकडुन जेट पँचर तंत्राच्या साह्याने सांगवी परिसरातील मोठे खड्डे बुजविण्यात आले होते. मात्र गेल्या चारपाच दिवसापासुन सतत पडणा-या संततधार पावसामुळे जेट पँचर तंत्राच्या साह्याने दुरूस्त करण्यात आलेले मोठमोठे खड्डे उघडे पडल्याने रहिवाशी नागरीकांना येथुन रहदारीसाठी कसरत करावी लागत आहे. औंध पुणे याकडे जाण्यासाठी या रस्त्याचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. याच रस्त्यावर एक शाळा, उद्यान असल्याने सकाळी शाळा भरण्याच्या व संध्याकाळी शाळा सुटण्याच्या वेळेला मोठी गर्दी असते. अनेकदा खड्डे चुकविण्याच्या नादात दुचाकीस्वार घसरून पडण्याच्या घटना या रस्त्यावर घडत आहेत.

शाळकरी मुले, पादचारी यांना जिव मुठीत घेवुन या रस्त्यावरून चालावे लागत आहे. खड्डे,रस्त्यावर पसरलेली खडी,पाण्याखाली न दिसणारे खड्डे यामुळे हा रस्ता रहदारीसाठी धोकादायक बनला आहे.गत महिन्यातच जेट पँचर तंत्राच्या साह्याने केलेली डागडुजी फोल ठरली आहे. याबाबत नागरीकांमधुन तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.खड्ड्यांमुळे अपघात झाल्यास जबाबदार कोण अशा प्रतिक्रिया जनसामान्यातुन बोलल्या जात आहेत. कोट-येत्या दोन तीन दिवसात येथील खड्ड्यांची दुरूस्ती करण्यात येईल

- सचिन सानप कनिष्ठ अभियंता स्थापत्य विभाग
गेल्या महिन्यातच स्थापत्य विभागाकडुन सांगवी परिसरातील खड्डे जेट पँचरच्या साह्याने दुरूस्त केले होते.मात्र ते फोल ठरले आहे.पुन्हा जैसे थे परिस्थिती निर्माण झाली आहे.या रस्त्याची तात्काळ दुरूस्ती करण्याबाबत संबंधितांना सांगीतले आहे.

- संतोष कांबळे, नगरसेवक जुनी सांगवी प्रभाग क्रं ३२
संगमनगर ते शितोळेनगर शिवांजली कॉर्नर मुळानदी किनारा रस्त्याची खड्डे पडुन चाळण झाली आहे.पालिका प्रशासन केवळ तात्पुरती डागडुजी करून नागरीकांच्या जिवाशी खेळत आहे.-संजय गायकवाड -नागरीक
 
Web Title: Roads are damanged in sangavi due to rain