रस्त्यांवरील अतिक्रमणे हटवून रस्ते खुले

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 31 मे 2018

उरुळी कांचन - उरुळी कांचन (ता. हवेली) येथे ११ व्या वित्त आयोगातून तयार करण्यात आलेल्या तांबे वस्ती व साळुंखे वस्तीच्या रस्त्यावरील अतिक्रमणे काढून सदरचे रस्ते त्वरित मोकळे करण्याचे आदेश जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) संदीप कोहीणकर यांनी उरुळी कांचन ग्रामपंचायतीला दिले आहेत. माजी जिल्हा परिषद सदस्य महादेव कांचन यांनी या रस्त्यांवर अडथळे निर्माण केल्याचा आरोप येथील ग्रामस्थांनी केला होता, या पार्शवभूमीवर जिल्हा परिषदेने ग्रामपंचायतीला वरील आदेश दिले आहेत.

उरुळी कांचन ग्रामपंचायत हद्दीमधील तांबे वस्ती व साळुंखे वस्ती येथे जिल्हा परिषदेच्या ११ व्या वित्त आयोगाच्या निधीतून स्थानिक नागरीकांना वापरण्यासाठी तीन रस्ते तयार करण्यात आले होते. मात्र महादेव कांचन यांनी या रस्त्यांवर अतिक्रमण करून सदरच्या रस्त्यावर ताबा केल्याचा आरोप येथील ग्रामस्थांनी केला होता. तसेच या तीनही रस्त्यांवरील अतिक्रमणे काढून सदरच्या रस्त्यांची ग्रामपंचायत दप्तरी नोंद व्हावी यासाठी येथील तरुणांनी जिल्हा परिषद व ग्रामपंचायत प्रशासनाच्या विरोधात उपोषण देखील केले होते.

दरम्यान २४ जानेवारी २०१७ रोजी हे रस्ते ग्रामपंचायतीकडे हस्तांतरित करून या रस्त्यांची ग्रामपंचायत दप्तरी नोंद करण्यात आली. तसेच या रस्त्यांवरील अतिक्रमणे हटवून रस्ते खुले करून देण्याचे आदेश बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यांनी महादेव कांचन यांना दिले होते. मात्र अद्याप या रस्त्यावरील अतिक्रमण हटविले नसल्याने उरुळी कांचन ग्रामपंचायतीला या रस्त्यावरील अतिक्रमण हटविण्याचे आदेश दिले आहेत. याचबरोबर सुरक्षेच्या दृष्टीने पोलीस संरक्षणात वरील आदेशाची अंमलबजावणी करावी असे देखील आदेशामध्ये स्पष्ट करण्यात आले आहे.

 तांबे वस्ती व साळुंखे वस्ती येथील रस्त्यावरील अतिक्रमणे काढण्यासाठी संबंधितांना येत्या ६ जूनपर्यंतची मुदत दिली आहे. तसेच दिलेल्या मुदतीमध्ये सदरचे अतिक्रमण न हटविल्यास जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या आदेशाप्रमाणे पोलीस बंदोबस्तात अतिक्रमणे काढण्यात येणार आहेत. 
- के. जी. कोळी, ग्रामविकास अधिकारी, ग्रामपंचायत उरुळी कांचन, ता. हवेली.

Web Title: Roads opened by deleting encroachments on roads