मुख्यमंत्र्यांच्या 'महाजनादेश'मुळे रस्त्यावरील खड्डे गायब

महेंद्र शिंदे
शनिवार, 14 सप्टेंबर 2019

गेल्या अनेक महिन्यांपासून या रस्त्यावर असलेले खड्डे मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेच्या निमित्ताने का होईना बुजविले जात आहेत. त्यामुळे आमचा या रस्त्यावरील प्रवास काहीसा सुखकर होईल, असे मत प्रवासी व्यक्त करत आहेत.  

खेड-शिवापूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उद्या (ता.15) रोजी पुणे-सातारा रस्त्यावरून जाणाऱ्या महाजनादेश यात्रेमुळे शनिवारी सकाळपासून रिलायन्स इन्फ्राने या रस्त्यावरील खड्डे बुजविण्यास सुरवात केली आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून या रस्त्यावर असलेले खड्डे मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेच्या निमित्ताने का होईना बुजविले जात आहेत. त्यामुळे आमचा या रस्त्यावरील प्रवास काहीसा सुखकर होईल, असे मत प्रवासी व्यक्त करत आहेत.  

पुणे-सातारा रस्त्यावर पडलेल्या खड्डयांमुळे गेल्या अनेक महिन्यांपासून या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. या खड्डयांमुळे होणाऱ्या वाहतूक कोंडीने या रस्त्यावरील प्रवासी त्रस्त झाले आहेत. प्रवाशांची खड्डयांमुळे मोठी गैरसोय होत असली तरी खड्डे बुजविण्याची तात्पुरती मलमपट्टी करण्यापलीकडे रिलायन्स इन्फ्राकडून जास्त दखल घेण्यात येत नव्हती. मात्र, रविवारी (ता.15) या रस्त्याने मुख्यमंत्र्यांच्या जाणाऱ्या महाजनादेश यात्रेमुळे रिलायन्स इन्फ्राला जाग आली आहे. शनिवारी सकाळपासून रिलायन्स इन्फ्राने या रस्त्यावरील खड्डे बुजविण्यास सुरवात केली आहे. साताऱ्याकडे जाणाऱ्या बाजुकडील खड्डे बुजविण्यात आले आहेत.

गळा आवळून विवाहितेचा खून

मोठ्या प्रमाणात दुरावस्था झालेल्या ठिकाणी थेट डांबरीकरण करण्यात येत आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेच्या निमित्ताने का होईना या रस्त्यावरील खड्डे बुजविले जात असून, या रस्त्यावरील आमचा प्रवास काहीसा सुखकर होईल, असे मत प्रवासी व्यक्त करत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Roads Repair due to CM Mahajadesh Rally