दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेली टोळी गजाआड 

पांडुरंग सरोदे
गुरुवार, 12 जुलै 2018

पुणे : सोलापूर रस्त्यावरील पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या टोळीस हडपसर पोलिसांनी गजाआड केले. त्यांच्याकडून धारदार शस्त्रे व गाड्या जप्त करण्यात आल्या आहेत. 

प्रतीक ऊर्फ नोन्या संजय वाघमारे (वय 19, रा. शांतिनगर वसाहत, हडपसर), पंकज धनंजय जाधव (वय 19, रा. महादेवनगर, मांजरी), आकाश दादासाहेब भापकर (वय 19, रा. कवडीपाट, लोणी काळभोर), रूपेश सुभाष कोळी (वय 21, रा. महादेवनगर, मांजरी) व अन्य एक अशा एकूण पाच जणांना पोलिसांनी अटक केली आहे.

सोलापूर रस्त्यावरील द्राक्ष संशोधन केंद्रासमोर दोन दुचाकीवरील पाच जण संशयास्पदरीत्या फिरत असल्याची माहिती हडपसर पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिस उपनिरीक्षक मंगेश भांगे यांच्या पथकाने सापळा रचून या पाच जणांना अटक केले. त्यांच्याकडून दोन लोखंडी कोयते, एक चाकू, मिरची पावडर या वस्तूंसह दोन दुचाकी, असा 80 हजार रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतल्या आहे. 
 
Web Title: robber get arrested