दरोडेखोरांनी लुटला अडीच लाखांचा लसूण 

thief2
thief2

कोरेगाव भीमा (पुणे) : सध्या कांदा व लसणाचे वाढलेले बाजारभाव पाहता, त्यांच्याही चोऱ्यांत वाढ झाल्याने त्यांचीही राखणदारी करायची वेळ आता शेतकऱ्यांवर आली आहे. अशाच एका दरोड्याच्या घटनेत चक्क लसूणच लुटण्यात आला आहे. लोणीकंद पोलिसांवर आता चोरी गेलेला हा लसूण व अज्ञात चोरटे शोधण्याची वेळ आली आहे. 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वढू खुर्द (ता. हवेली) येथील निंजाकार्ट गोदामाच्या रखवालदाराला अज्ञात 13 ते 14 जणांनी दमदाटी व मारहाण करून लसूण भरलेल्या 30 गोण्या तसेच मोबाईल असा एकूण अडीच लाख रुपयांचा ऐवज चोरून नेला. 

बुधवारी (ता. 20) सकाळी साडेसहाच्या सुमारास याप्रकरणी फिर्यादी स्वप्नील पाटील यांनी दिलेल्या तक्रारीनुसार लोणीकंद पोलिस ठाण्यात दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लोणीकंद पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक पडळकर तपास करीत आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com