जुन्नर - चार ठिकाणी चोऱ्या, दीड लाखाचा ऐवज चोरी

पराग जगताप
शनिवार, 17 मार्च 2018

ओतूर, जुन्नर (पुणे) : डिंगोरे (ता.जुन्नर) गावच्या हद्दीत बनकरफाट्यावर आज शनिवारी मध्यरात्री दरम्यान चार ठिकाणी घरफोड्या झाल्या असुन यातील दोन घरातून सोन्याच्या दागिने व रोख रक्कम मिळुन एकुण एक लाख चाळीस हजार रुपयाचा ऐवज चोरीला गेला आहे.

ओतूर, जुन्नर (पुणे) : डिंगोरे (ता.जुन्नर) गावच्या हद्दीत बनकरफाट्यावर आज शनिवारी मध्यरात्री दरम्यान चार ठिकाणी घरफोड्या झाल्या असुन यातील दोन घरातून सोन्याच्या दागिने व रोख रक्कम मिळुन एकुण एक लाख चाळीस हजार रुपयाचा ऐवज चोरीला गेला आहे.

राजाराम जिजाबा उकिर्डे यांच्या घराच्या दरवाजाचे कुलुप कापुन अज्ञात चोरट्यांनी लोखंडी कपाटातील लॉकर मध्ये ठेवलेले सोसायटीचे कर्ज भरण्यासाठी आणलेले 90 हजार रुपये रोख लॉकर तोडुन चोरुन नेले. तसेच दीड तोळे वजनाचे सोन्याचे नेकलेस अंदाजे 25 हजार रुपये किमंतीचे, 2 ग्रॅम वजनाच्या 5 हजार रुपये किंमतीच्या सोन्याच्या दोन रिंगा, 2 हजार रुपयाची नथ असा एकुण एक लाख बावीस हजार रुपये किंमतीचा ऐवज चोरट्यांनी चोरुन नेला.

चोरी झाल्याचे त्यांच्या सकाळी सहा वाजता उठल्यावर त्यांच्या लक्षात आले. तसेच त्यांच्या समोरील धोंडिभाऊ भिमाजी उकिर्डे यांच्या घरात अज्ञात चोरट्यांनी प्रवेश करुन पँटच्या खिश्यातील रोख दहा हजार रुपये व आठ हजार रुपये किंमतीचे दोन मोबाईल चोरुन नेले. तर घरातील लोखंडी पेटी व सुटकेस घराबाहेर अस्तव्यस्त टाकलेली मिळाली. तसेच येथिल सेवा निवृत्त पोलीस निरिक्षक रखमाजी जिजाबा उकिर्डे यांच्या बंगल्याच्या बाजुला असलेल्या स्टोअररुम मध्ये प्रवेश करुन तेथील दोन लोखंडी कपाटचे दरवाजे उचकटुन त्यातील ड्रॉवर व इतर सामान तपासुन रुमच्या बाहेर अस्त व्यस्त टाकुन करुन अज्ञात चोरट्यानी टाकले.

तसेच येथीलच शिवाजी कोंडीभाऊ उकिर्डे यांच्या घराला बाहेरुन कडी लावुन बाजुच्या दरवाज्याचा कडी कोयंडा तोडुन तेथील एक लोकंडी पेटी उचलुन अंदाजे दीडशे फुट लांब नेऊन त्या पेटीतील किंमती ऐवज चोरुन नेला. याबाबत ओतूर पोलीसात अज्ञात चोराट्या विरुध्द गुन्हा दाखल केला असल्याची माहिती ठाणे अमलदार प्रकाश नटके यानी दिली आहे.तर पुढील प्राथमिक तपास सहायक पोलीस निरिक्षक ज्योती डमाळे  करीत आहे.

दरम्यान ओतूर, उदापूर, डिंगोरे परिसरात या चोरीच्या घटनेने खळबळ उडाली असुन पोलीसानी रात्रीची गस्त वाढवुन या चोरट्याच्या टोळीचा लवकरात लवकर बंदोबस्त करावा अशी मागणि होत आहे.

Web Title: robbery at 4 places, 1.5 lack stolen