व्हॉट्‌सॲपमुळे लुटारू गजाआड

WhatsApp
WhatsApp

पुणे - पोलिस अधिकारी असल्याची बतावणी करून लूटमार करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला गुन्हे शाखेच्या युनीट चारच्या पथकाने अटक केली. व्हॉट्‌सॲपमुळे बिंग फुटल्याने हा तोतया पोलिसांच्या जाळ्यात सापडला.  

आरोपीविरुद्ध इस्लामपूर, सांगली, ठाणे, नवघर, भिवंडी, सातारा, नाशिक व नगर येथे २५ ठिकाणी लूटमार केल्याचे गुन्हे दाखल आहेत.

आयात अली बाबूलाल अली इराणी (रा. इराणी वस्ती, श्रीरामपूर, नगर) असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. इस्लामपूर येथे पहाटे ज्येष्ठाला पोलिस अधिकारी असल्याचे सांगून इराणीने त्यांच्याकडील एक तोळ्याची सोन्याची अंगठी, तीन हजार रुपये असा ऐवज काढून घेतला होता. या प्रकरणी इस्लामपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होता. संबंधित गुन्ह्याचे चित्रीकरण पुणे पोलिसांना व्हॉटस्‌ॲपद्वारे प्राप्त झाले होते. पोलिस कर्मचारी रमेश राठोड यांनी हा व्हिडिओ पाहिल्यानंतर संबंधित चोरटा हा सराईत गुन्हेगार इराणी असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.   अधिक चौकशी केल्यानंतर आरोपी सध्या श्रीरामपूर येथे असल्याची खबर त्यांना मिळाली. त्यानुसार, पोलिस निरीक्षक अंजुम बागवान यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक विजय झंजाड, पोलिस कर्मचारी अतुल मेंगे, सुरेंद्र साबळे, रमेश राठोड, शीतल शिंदे यांचे पथक श्रीरामपूर येथे गेले. तेथून त्यांनी इराणीस अटक केली. पुढील तपासासाठी इस्लामपूर पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com