Pune Crime : इंदापूर तालुक्यातील कालठण नंबर 2 येथे दोन ठिकाणी दरोडा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Robbery at two places indapur gold and mobile phones stolen crime police

Pune Crime : इंदापूर तालुक्यातील कालठण नंबर 2 येथे दोन ठिकाणी दरोडा

इंदापूर : तालुक्यातील कालठण नंबर 2 येथे बुधवारी रात्री चार अज्ञात चोरट्यांनी एका ठिकाणी कोयत्याचा धाक दाखवीत दोन मोबाईल फोन तर दुसरीकडे धाडसी दरोडा टाकला या दोन्ही घटनेमध्ये सोन्याचे दागिने, मोबाईल असा एकूण 4 लाख 80 हजाराचा मुद्देमाल लंपास केला. याबाबत इंदापूर पोलिस स्टेशन येथे गुन्हा दखल करण्यात आला आहे.

याबाबत सागर नामदेव रेडके (वय 30 वर्षे, धंदा शेती रा कालठन नं 2 ता इंदापुर जि पुणे) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार बुधवार (ता.03) रोजी रात्री 12 ते 2 च्यादरम्यान फिर्यादीचे राहते घराच्या जवळ राहणाऱ्या नामे नवनाथ मेटकरी यांचे घरात घुसुन कोयत्याचा धाक दाखवुन चार दरोडेखोरांनी लाथाबुक्यांनी मारहान करून जबरदस्तीने विवो कंपनीचे 20 हजार रुपये किमतीचे दोन मोबाईल हिसकावून नेले.

यावेळी मेटकरी यांनी मदतीसाठी बोलविल्याने त्यांच्यासह फिर्यादी परिसरात चोराचा शोध घेत फिरून येण्यापूर्वी त्यांच्याच घरातील रूमचे कुलुप तोडुन चोरांनी घरातील कपाटातील 1 लाख 50 हजार रुपये किमतीचे सोन्याचे मनी मंगळसुत्र, 1 लाख 20 हजार रुपये किमतीचे सोन्याचे गंठन, 40 हजार रुपये किमतीची अंगठी, 30 हजार रुपये किमतीचा एक तोळा वजनाचे चकोर,

45 हजार रुपये किमतीची सोन्याची चैन व 75 हजार रुपये किमतीची दुसरी सोन्याची चैन असे एकूण 4, लाख 60 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने तसेच मेटकरी यांचे 20 हजार रुपयाचे मोबाईल असे एकूण 4 लाख 80 हजार रुपयांचा मुद्दाम चोरुन नेला.पुढील तपास पोलिस निरीक्षक दिलीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक योगेश लंगुटे करीत आहेत.

टॅग्स :Pune Newspolicecrime