निगडीत 48 लाखांची रोकड लुटून कर्मचाऱ्यांवर वार

संदीप घिसे
गुरुवार, 3 मे 2018

आकुर्डीमधील एलआयसी तसेच इतर बँकेची रोकड घेऊन चाललेल्या चेकमेट या कंपनीच्या कर्मचाऱ्यांवर वार करुन चौघांनी अंदाजे ४८ लाख रुपयांची रोकड लुटून नेली.

पिंपरी : एलआयसीची रोकड बँकेत भरण्यासाठी चाललेल्या कर्मचाऱ्यांवर चार जणांनी वार करीत अंदाजे ४८ लाखांची रोकड लुटून नेली. ही घटना गुरुवारी दुपारी यमुनानगर निगडी येथे घडली. 

आकुर्डीमधील एलआयसी तसेच इतर बँकेची रोकड घेऊन चाललेल्या चेकमेट या कंपनीच्या कर्मचाऱ्यांवर वार करुन चौघांनी अंदाजे ४८ लाख रुपयांची रोकड लुटून नेली. चोरटे दोन दुचाकीवरून आल्याची माहिती पोलिसांनी दिली. जखमी कर्मचाऱ्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याबाबत अधिक तपास सुरू आहे.

Web Title: Robbery robbed of Rs 48 lakh linked to employees

टॅग्स