मुंबई-विजापूर पॅसेंजरवर दरोड्याचा प्रयत्न

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 17 जानेवारी 2019

पुणे - मुंबई- विजापूर पॅसेंजर रेल्वेवर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या दोन अल्पवयीन मुलांसह सात जणांना पुणे लोहमार्गच्या स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केले. पोलिसांनी आरोपींच्या ताब्यातून दोन चाकू आणि मिरचीपूडसह दरोड्याचे साहित्य जप्त केले आहे.

पुणे - मुंबई- विजापूर पॅसेंजर रेल्वेवर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या दोन अल्पवयीन मुलांसह सात जणांना पुणे लोहमार्गच्या स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केले. पोलिसांनी आरोपींच्या ताब्यातून दोन चाकू आणि मिरचीपूडसह दरोड्याचे साहित्य जप्त केले आहे.

तळेगाव रेल्वेस्थानक येथे पॅसेंजर रेल्वेवर काहीजण दरोडा टाकणार असल्याची माहिती गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक सुरेशसिंह गौड यांना मिळाली. त्यावरून तीन पथके तयार करण्यात आली.या पथकांनी तळेगाव रेल्वेस्थानकावर दरोडेखोरांवर पाळत ठेवली. मंगळवारी पहाटे तीनच्या सुमारास प्लॅटफॉर्म एकवर मुंबई-विजापूर पॅसेंजर रेल्वे थांबली.त्यावेळी १४ जण रेल्वेतील महिलांच्या डब्यात दरोडा टाकण्याच्या प्रयत्नात होते. त्यापैकी पोलिसांनी सातजणांना ताब्यात घेतले. परंतु या वेळी झालेल्या झटापटीत इतर 
सात जण अंधाराचा फायदा घेऊन पसार झाले. शंकर भीमराव जगले (वय २०), यशवंत बाळू वाघमारे (वय २०, दोघे रा. गांधीनगर झोपडपट्टी, पिंपरी), अशोक संतोष आडवानी (वय २१, नानेकरचाळ, पिंपरी), समाधान कांताराम वणवे (वय २१, रा. बोलेगाव, जि. नगर) आणि श्रीनिवास व्यंकटस्वामी सिडगल (वय ३६, रा. आंबेडकरनगर, देहूरस्ता) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत, तर अन्य दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे. न्यायालयाने आरोपींना १८ पर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. पुणे लोहमार्गचे पोलिस अधीक्षक तुषार पाटील यांच्या सूचनेनुसार निरीक्षक सुरेशसिंग गौड, सहायक निरीक्षक मंगेश जगताप, सहायक उपनिरीक्षक भोसले, बनसोडे, हवालदार धनंजय दुगाने, अनिल दांगट, जगदीश सावंत, पोलिस कर्मचारी सुनील कदम, दिनेश बोरनारे आदींनी ही कारवाई केली.

Web Title: Robbery Trying on Mumbai Vijapur Passenger