'डॉक्टर रोबो'ची कमाल! पुण्यात पार पडली कॅन्सरवर यशस्वी सर्जरी!

Robot performs cancer surgery in Pune
Robot performs cancer surgery in Pune

पुणे  : पुण्यात चक्क एका रोबोने रुग्णावर शस्त्रक्रिया  केली आहे, इतकेच नव्हे तर शस्त्रक्रिया यशस्वीपणे पारही पाडली. पुण्यातील रुबी क्लिनिकमध्ये एका रुग्णावर रेक्टम शस्त्रक्रिया रोबोमार्फत करण्यात आली. कोणत्याही अवयवास धक्का न पोहचवता अगदी नाजूकपणे ही शस्त्रक्रिया पार पाडली आहे. 

65 वर्षाच्या जया (नाव बदलेले) यांनी काही दिवसांपासून शौचास त्रास होत होता, रक्तही पडत होते. त्रास वाढल्यानंतर डॉक्टरांनी त्यांच्या काही तपसण्या करुन घेतल्या आणि त्यांना रेक्टल कॅन्सर असल्याचे समोर आले. त्यांच्या रेक्टमध्ये गाठ (ट्युमर) आणि मुत्राशया खडे झाले होते. त्यामुळे डॉक्टरांपुढे या शस्त्रक्रियाचे मोठे आव्हान उभे राहीले होते. गाठ अगदी नाजुक ठिकाणी म्हणजे गुद्दद्वारजवळ होती. त्यामुळे तेथील भागात हानी न पोहचवता शस्त्रक्रिया करणे कठीण होते पण, डॉक्टरांसह रोबोने ही अवघड शस्त्रक्रिया पार पडली आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

थ्रीडी व्हिजन असलेल्या रोबोच्या हातांच्या हालचाली अगदी सर्जनच्या बोटांप्रमाणेच होते. हा रोबो इतक्या उत्तमपणे शस्त्रक्रिया करतो ज्यामुळे नर्व्हला जास्त हानी पोहचत नाही आणि कमी रक्तस्त्राव होतो. ज्यामुळे रुग्ण लवकर बरा होऊन घरी जातो. या शस्त्रक्रियानंतर जया पुर्णपणे बऱ्या होऊन त्यांना डिस्चार्जही मिळाला आहे. तसेच कोरोनाच्या काळातही ही शस्त्रक्रिया महत्त्वपुर्ण ठरणार आहे. या शस्त्रक्रिया डॉक्टर आणि रुग्णांचा संपर्क कमी आला.  

रेक्टम शस्त्रक्रियेमध्ये गुद्द्वाराजवळील भागाला ईजा पोहचून न देणे मोठे आव्हान असते. अनेक रुग्णांना याचीच चिंता असते. काही प्रकरणांमध्ये गुद्दद्वाराजवळ शौचावर नियंत्रण ठेवणारे  स्नायूही वाचवता येत नाहीत. यामुळे ओटीपोटावर असा कायमचा खुला असलेला भाग बनवावा लागतो जिथून शरीरातील टाकाऊ घटक एका बॅगेत जमा होतील, याला वैद्यकीय भाषेत स्टोमा असं म्हणतात. पण रोबोटिक शस्त्रक्रियामुळे हे सर्व टाळता येतं.  तात्पुरता स्टोमा तयार करण्यात येतो ज्याची सहा आठवड्यांनंतर गरज पडत नाही. त्यानंतर रुग्ण सामान्यपणे नैसर्गिकरित्या शौच करू शकतो. 

कोरेगाव भीमा येथे नागरिकांची होणार आरोग्य तपासणी 

जया यांच्या रेक्टम शस्त्रक्रियाबाबत, रुबी हॉल क्लिनिकच्या ऑन्कोशस्त्रक्रिया, रोबोटिक शस्त्रक्रिया, जीआय शस्त्रक्रियाचे कन्सलटंट डॉ. आदित्य कुलकर्णी  म्हणाले, "रुग्णाचं सीटी स्कॅन आणि कोलोनोस्कोपी करण्यात आली. त्यावेळी तिथं एक ट्युमर असल्याचं दिसलं आणि कॅन्सर असल्याचंही निदान झालं. त्यांना दुसऱ्या किंवा तिसऱ्या टप्प्यातील रेक्टम कॅन्सर होता. त्यासाठी केमोथेरेपी आणि रेडिएशन थेरेपी घेण्यास सांगण्यात आली. जेणेकरून ट्युमर कमी होईल. याचवेळी रुग्णाच्या मूत्राशयातही स्टोन असल्याचं दिसले केमोथेरेपी आणि रेडिएशन झाल्यानं रुग्णाला रोबोटिक शस्त्रक्रियाचा पर्याय दिला. ओपन शस्त्रक्रियामध्ये ट्युमर पूर्णपणे काढणं म्हणजे खूप कठिण होतं. कारण कॅन्सरची गाठ गुद्द्द्वाराच्या अगदी जवळ होती. त्यामुळे रोबोटिक शस्त्रक्रियामुळे ट्युमर आणि तेथील लिम्फ नोड्समध्ये पूर्णपणे काढणं खूप सोपं झालं. याच शस्त्रक्रियामुळे मूत्राशयातील स्टोनही काढण्यात आले. यासाठी जवळपास 5 तास लागले" 

''आम्ही प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करतो आणि तो यशस्वीही होतो. जगातील सर्वोत्तम अशी रोबोटिक शस्त्रक्रिया उपलब्ध करून देणं हे आमचं ध्येय आहे.'' अशी माहिती रुबी हॉल क्लिनिकचे सीओओ डॉ. मनीषा करमकर यांनी दिली.

न्यायालयीन कामकाज पूर्णतः सुरू करण्याला तारीख पे तारीख

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com