रोहित पवारांचे जुन्नर तालुक्यात तरुणांकडुन उस्फुर्त स्वागत

pune
pune

ओतूर (जुन्नर) :  राष्ट्रवादी कॉंग्रेचे युवा नेते व जिल्हा परिषद सदस्य रोहित पवार हे आज (ता.26)  जुन्नर तालुक्याच्या दौर्यावर आले होते. ते जुन्नरवरुन ओतूरला येत असताना ठिकठिकाणी तरुणवर्गाने त्यांचे उत्साहात स्वागत केले

बनकरफाटा (ता.जुन्नर) येथे मोठ्या प्रमाणात तरुण वर्ग जमलेला होता. पवार यांच्या गाडीचे आगमन होताच फटाक्यांची आतीष बाजी करुन मधुर वाद्याने त्यांचे येथे स्वागत करण्यात आले. यावेळी  महाराष्ट्र राज्य राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेशे उपाध्यक्ष अतुल बेनके, जिल्हा परिषद सदस्य मोहित ढमाले, पंचायत समिती सदस्य विशाल तांबे, तुषार थोरात, जालंदर पानसरे व मोठ्या प्रमाणात तरुण वर्ग त्यांच्या बरोबर होता. बनकरफाटा येथे जिल्हा परिषद सदस्य अंकुश आमले, माजी जि.प.सदस्य बबन तांबे, पंचायत समिती सदस्य नंदा बनकर, उदापूर ग्रामविकास मंडळाचे अध्यक्ष प्रभाकर शिंदे, पांडुरंग शिंदे, संजय शिंदे, बी.एम.शिंदे, अशोक शिंदे, डिंगोरचे उपसरपंच गणेश उकिर्डे, शिवाजी शेरकर, अमित बनकर, जुन्नर तालुका ठाकर संघटनेचे उपाध्यक्ष रायबा घोगरे, ठाकर संघटनेचे युवक अध्यक्ष संतोष मेंगाळ,कोळवाडी ग्रामपंचायत सदस्य सहादु मेंगाळ, काशिनाथ जाधव, विलास मेंगाळ तसेच आदिवासी भागातील तरुण वर्ग व उदापूर व डिंगोरे येथील तरुण वर्ग तसेच परिसरातील शेतकरी वर्गाने मोठ्या प्रमाणात उपस्थित राहुन पवार यांचे स्वागत व सत्कार केले. बनकरफाट्या पासून पुढे रोहित पवार यांनी बुलेटवर प्रवास केला यावेळी परिसरातील तरुणाईने ही त्यांच्या बरोबर दुचाकीची रॅलीत सहभागी झाली होती. यावेळी ओतूर पोलीसानी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता.

 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com