रोहित पवारांचे गणेशोत्सव मंडळाना आवाहन; काय म्हणाले...

Rohit Pawars appeal to Ganeshotsav Mandal
Rohit Pawars appeal to Ganeshotsav Mandal

पुणे : कोरोनाच्या संकटाने थैमान घातलेले असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी गणेशोत्सव मंडळाना एक आवाहन केले आहे. गणेश मंडळे यावर्षी लोकांच्या हिताचा विचार करून गणेशोत्सव साधेपणाने साजरा करतील अशी अपेक्षा असल्याचे रोहित पवार यांनी म्हटले असून सर्व गणेशमंडळे यावर सकारात्मक विचार करतील असा विश्वास असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

कोरोनामुळे लालबागच्या राजाने परंपरेला मुरड घालून लोकहितासाठी यंदा तीन फूट उंचीचीच मूर्ती बसवून साधेपणाने उत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. याबद्दल विश्वस्तांचे मी आभार मानतो. या ट्रस्टने नेहमीच लोकहिताची भावना समजून सामाजित हित जपलं आहे. यावर इतरही मंडळे विचार करतील असे रोहित पवार यांनी सांगितले आहे.
----------------
...तर स्टॅच्यू ऑफ युनिटी हटवायला पाहिजे; 'या' नेत्याने केली मागणी
----------------
काश्मीरमध्ये पुन्हा दहशतवाद्यांसोबत चकमक; एक दहशतवादी ठार
----------------
दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रोहित पवार सातत्याने लक्षवेधी सूचना करत असल्याचे दिसून येत आहे. काल (ता. २५) रोहित पवार यांनी घरमालकांना एक पत्र लिहले आहे. रोहित पवार यांनी म्हटले होते की, कष्टकरी, मजूर, शेतकरी, कामगार यांची आर्थिक स्थिती वाईट झाली आहे. त्यातच घराचे भाडे थकल्याने घरमालक व भाडेकरू यांच्यात संघर्ष सुरू झाला आहे. पुण्यात काही ठिकाणी तर सामान बाहेर फेकून देण्याचे प्रकार घडले होते. याबाबत रोहित पवार यांना विद्यार्थी, कामगार यांनी फोन करून कैफियत मांडली होती. त्यावर पवार यांनी सर्व घरमालकांना उद्देशून एक पत्रच लिहिले होते. त्यामध्ये परस्थितीचे वास्तव्य मांडताना 'माणुसकी आता नाही तर कधी दाखवायची' असा प्रश्नही त्यांनी केला होता. त्याचबरोबर घरभाडे माफ करण्याची विनंती केली होती.

त्यांनी म्हटले होते की, आज कोरोनाचं संकट आलं नसलं तर घरभाडं माफ करा किंवा कमी करा असं तुम्हाला कुणीही म्हणलं नसलं. अडचण आहे म्हणूनच तुम्हाला विनंती करतोय. या विनंतीला मान देऊन सद्सद्विवेकबुद्धीनुसार तुम्ही भाड्याबाबत योग्य निर्णय घ्याल, असा मला विश्वास असल्याचे त्यांनी म्हटले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com