Vidhan Sabha 2019 : नवमतदारांची रोखठोक भूमिका

new voter
new voter

विधानसभा 2019 
पुणे -  विविध समस्यांबाबत आपण राज्यकर्त्यांना जाब विचारतो. जर आपण निवडणुकीत मतदान केले, तरच आपल्याला त्यांना जाब विचारण्याचा नैतिक अधिकार आहे, अशी रोखठोक भूमिका घेणारा नवमतदार शहरातील मतदान केंद्रांवर दिसला. 

काहीसा उत्सुक, प्रथमच मतदान करत असल्यामुळे थोडासा गोंधळलेला, कुटुंबासोबत मतदानाचा आनंद आणि नागरिक म्हणून पार पाडलेली जबाबदारी यामुळे काहीशा अभिमानाने नवमतदार केंद्रातून बाहेर पडताना दिसत होते. मतदान केलेला सेल्फी, फॅमिली फोटो काढून समाज माध्यमांवर टाकण्याची चढाओढ दिसत होती. 

प्रथमच मतदान करणाऱ्या तरुणांना औषधी रोपे आणि चंदनाच्या बियांचे वाटप करण्यात आले. हरितमित्र परिवार, सामाजिक वनीकरण आणि उद्यान विभागाच्यावतीने कर्वे रस्त्यावरील कलमाडी हायस्कूलमध्ये या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. हरितमित्र परिवाराचे अध्यक्ष डॉ. महेंद्र घागरे, सामाजिक वनीकरण विभागाचे उपसंचालक दिलीप घोलप, प्रीती सिन्हा यांच्या हस्ते रोपांचे वाटप करण्यात आले. 

रोपांची वर्षभर काळजी घेणाऱ्या नवमतदारांचा हरितमित्र परिवाराच्यावतीने गौरव केला जाणार आहे. कार्यक्रमाचे आयोजन दीपक गायकवाड, सुरेश परांजपे, राजेंद्र मोरे, बाळा ढमाले, प्रा. रवी पिल्ले, राजेश बाहोती आदींनी केले.

आवडता उमेदवार निवडण्याची संधी आपल्याला मिळालेली असते. त्यामुळे पहिल्यांदा मतदान करणे अत्यंत आनंददायी होते. 
- रोहन देशमुख

मी पहिल्यांदाच मतदान केले. त्यामुळे जबाबदार नागरिक असल्याची जाणीव मला होत आहे. समाजाच्या दृष्टीने योग्य उमेदवारालाच मतदान केले. 
- पलक मल्लावत

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com