नेटमीटर रीडिंगच्या अडचणी सोडविणार

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 8 ऑगस्ट 2018

पुणे - रुफटॉप सौरऊर्जा प्रकल्पांच्या वीजग्राहकांच्या नेटमीटरचे रीडिंग आणि बिलिंगसंदर्भात असलेल्या अडचणी लवकरच सोडविण्यात येतील तसेच नेटमीटर व बिलिंग सुरू करण्याची प्रशासकीय कार्यवाही आणखी वेगवान करण्यात येईल, अशी माहिती महावितरणचे मुख्य अभियंता सचिन तालेवार यांनी दिली.

रुफटॉप सौरऊर्जा प्रकल्पधारक वीजग्राहकांसाठी विशेष ग्राहक तक्रार निवारण दिनाचे आयोजन महावितरणच्या पुणे परिमंडल अंतर्गत रास्ता पेठ येथील प्रशासकीय कार्यालयात करण्यात आले होते. या उपक्रमात सहभागी झालेल्या ३३ नेटमीटर वीजग्राहक व प्रतिनिधींशी संवाद साधला. यावेळी अधीक्षक अभियंता उत्क्रांत धायगुडे, सुंदर लटपटे, राजेंद्र पवार, पंकज तगलपल्लेवार उपस्थित होते.

या उपक्रमात प्रामुख्याने बिलिंगबाबतच्या तक्रारी अधिक असल्याचे दिसून आले. या वेळी महावितरणच्या माहिती तंत्रज्ञान आणि वित्त व लेखा विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून बिलिंगसंदर्भात असलेल्या तक्रारींचे निराकरण करण्यात आले. पुणे परिमंडलमध्ये सद्यःस्थितीत लघू व उच्चदाब वर्गवारीतील १४०२ नेटमीटरधारक वीजग्राहक आहेत. तक्रार दिनाच्या उपक्रमाचे आयोजन पुढील दोन महिन्यांत करण्यात येईल, असे महावितरणच्या वतीने सांगण्यात आले.

Web Title: rooftop solar power energy netmeter reading issue mahavitaran