नागरिकांनो, घरा बाहेर पडू नका; पुण्यात पोलिसांचे पथसंचलन

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 20 मे 2020

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये पोलिसांची जरब राहावी, नागरिकांनी घराबाहेर पडून नये या उद्देशाने 24 तास बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांनी सोशल डिस्टन्सिंग पाळत पथसंचलन केलं. 

une-news">पुणे) : हडपसर पोलिस ठाण्याच्या हद्दीत हडपसर पोलिसांकडून पथसंचलन करण्यात आले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये पोलिसांची जरब राहावी, नागरिकांनी घराबाहेर पडून नये या उद्देशाने 24 तास बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांनी सोशल डिस्टन्सिंग पाळत पथसंचलन केलं. 

हातावरचे पोट असलेल्यांचा संसार येणार रूळावर 

Image may contain: one or more people, people standing, crowd, wedding, hat, child and outdoor

सध्याच्या संचारबंदीच्या काळात पोलिस आपलं कर्तव्य चोखपणे बजावताना दिसत आहेत. यावेळी नागरिकांनी उत्स्फूर्तपणे पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सन्मानित केलं. तसेच टाळ्या, शंखनाद, पुष्पवृष्टी करून त्यांचं मनोबल वाढवलं. "भारत माता की जय', "वंदे मातरम', 'महाराष्ट्र पोलिस दलाचा विजय असो' असा जयघोषही यावेळी करण्यात आला. 

....म्हणून यूपीतील चित्रकुट येथील महिलेने पुणेकरांचे मानले आभार

Image may contain: one or more people, people standing, people walking and outdoor

या संचलनाची सुरवात तुकाईदर्शन, काळेपडळ, ससाणेनगर, हडपसर गाव, गाडीतळ परिसरातून झाली. त्यानंतर हडपसर पोलिस ठाण्यात त्याचा समारोप झाला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सोशल डिस्टन्सिंग पाळावे, विनाकारण घराबाहेर पडू नये असे यावेळी पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले. 

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे- क्लिक करा

हडपसर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक रमेश साठे म्हणाले, "नागरिकांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सतर्क राहावे, तसेच आपले विविध सण घरामध्ये बसूनच साजरे करावेत. कोरोनाची व्याप्ती गांभीर्याने आणि प्रादुर्भाव लक्षात घेऊन नागरिकांनी घराबाहेर पडू नये, तसेच जीवनावश्‍यक वस्तूंच्या नावाखाली सतत रस्त्यावर येऊ नये.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Root March of police in pune