Valentine day 2021 : गुलाबाच्या भावाला ‘गुलाबी

Rose Rate Increased Valentine day 2021
Rose Rate Increased Valentine day 2021

मार्केटयार्ड : ‘व्हॅलेनटाइन डे’च्या पार्श्‍वभूमीवर मार्केट यार्डातील बाजारात लाल गुलाबांना मागणी वाढली आहे. त्यामुळे भावही वाढले आहेत.फुलबाजारात २० फुलांच्या गड्डीला १८० ते २७० रुपये भाव मिळत आहे. त्यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. सद्य:स्थितीत बाजारात रोज १५०० ते २००० फुलांच्या गड्ड्यांची आवक होत आहे. किरकोळ बाजारात चांगल्या प्रतीच्या एका फुलाचा भाव १५ ते २० रुपयापर्यंत जाऊ शकतो. दोन दिवस फुलांची आवक मोठ्या प्रमाणात वाढणार असल्याची माहिती अखिल फूलबाजार अडते असोसिएशनचे अध्यक्ष अरुण वीर यांनी दिली.

खास ‘व्हॅलेनटाइन डे’साठी शेतकरी गुलाबाच्या बागा राखून ठेवतात. पुणे जिल्हा आणि विभागातून देशासह विदेशातही फुले पाठविली जातात. मात्र, यंदा कोरोनामुळे विमानांच्या फेऱ्यावर मर्यादा आली आहे. त्यातच विदेशातून मागणीही घटली आहे. त्यामुळे यावेळी शेतकरी विदेशापेक्षा स्थानिक बाजारपेठेत फुले विकण्यास प्राधान्य देत असल्याचे बाजारातील व्यापारी सागर भोसले यांनी सांगितले. स्थानिक बाजारपेठेतही यंदा गुलाबाच्या फुलांना चांगला दर मिळत आहे. विदेशात फुले पाठविण्यासाठी खर्चही अधिक होतो. त्या तुलनेत स्थानिक बाजारपेठेत फुले पाठविण्यासाठी अधिकचा वेळ आणि पैसेही खर्च करावे लागत नाहीत.

येथून होते आवक
पुणे जिल्ह्यातील मावळ, शिरूर
सातारा
सांगली
कोल्हापूर
नगर
सोलापूर

यंदा अनेक शेतकरी व्यापाऱ्यांना विदेशांत फुले पाठविता आली नाहीत. मात्र, स्थानिक बाजारात गुलाबाच्या फुलांना चांगला दर मिळत आहे. घाऊक बाजारात डच गुलाब आणि पिवळ्या गुलाबाच्या फुलांचा जो भाव मिळत आहे, तो समाधानकारक आहे. 
- साईनाथ दुडे, शेतकरी, कोळवण, ता. मुळशी

स्थानिक बाजारपेठेच्या तुलनेत विदेशांत गुलाबाच्या फुलांना अधिकचा भाव मिळतो. जागतिक प्रेम दिनानिमित्त पुणे विभागातून दरवर्षी सुमारे २५ ते ३० लाख फुले विदेशात पाठविली जातात. यंदा सुमारे ३ ते ५ लाख फुलेच विदेशात जातील, असा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहेत.
- अरुण वीर, अध्यक्ष, अखिल फूल बाजार अडते असोसिएशन

येथे पाठविले जातात
नागपूर
गुजरातमध्ये सुरत, बडोदा
मध्य प्रदेश येथील इंदूर
हैदराबाद
दिल्ली

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com