बारामतीत रोटरी क्लबने दिले पीपीई किट्स

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 31 May 2020

- 65 हजार रुपयांची पीपीई किट्स दिले.

बारामती : येथील रोटरी क्लब ऑफ बारामतीने सामाजिक बांधिलकीच्या नात्यातून आज 65 हजार रुपयांची पीपीई किट्स आज प्रदान केली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे 65 पीपीई किट देण्यात आली. रोटरी क्लबने सामाजिक बांधिलकी दाखवत ही किट दिल्याबद्दल अजित पवार यांनी रोटरीच्या सर्वच सदस्यांचे कौतुक केले. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

रोटरी क्लब ऑफ बारामतीचे अध्यक्ष प्रतीक दोशी, सचिव पार्श्वेन्द्र फरसोले यांच्यासह रोटरीचे अनेक सदस्य उपस्थित होते. बारामतीतील अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसह डॉक्टर्स व इतरांना याचा उपयोग होणार आहे. या प्रसंगी संदीप गुजर, दत्तात्रय बोराडे, डॉ. हणमंतराव पाटील, अब्बास नासिकवाला, विजय झांबरे, स्वप्नील मुथा, हर्षवर्धन पाटील, किशोर मेहता, अतुल गांधी, संजय दुधाळ, अरविंद गरगटे, विजय इंगळे, डॉ. नीलकंठ ढोणे, मल्लिकार्जुन हिरेमठ हे रोटरी सदस्य उपस्थित होते. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

यापूर्वीही बारामतीच्या रोटरी क्लबच्या वतीने विविध सामाजिक उपक्रमात सक्रीय सहभाग देण्यात आला आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rotary Club Distributed PPE kits in Baramati Pune